वांगी ग्रामपंचायतीचा कौल जिल्हा परिषद सदस्य निळकंठ आप्पा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आमदार संजय मामा शिंदे गटाकडे
करमाळा प्रतिनिधी
वांगी ग्रुप ग्रामपंचायत विभाजन ४० वर्षाच्या प्रयत्नानंतर होऊन नवीन ४ ग्रामपंचायत स्थापन झाल्या.नवीन स्थापन झालेल्या वांगी १ व वांगी ४ या ग्रामपंचायतीवर जिल्हा परिषद सदस्य निळकंठ आप्पा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आ.संजयमामा शिंदे गटाने एक हाती सत्ता स्थापन केलेली आहे .तर वांगी नंबर ३ ग्रामपंचायत मध्ये बागल गटाच्या सहकार्याने सत्ता स्थापन केलेली आहे. वांगी नंबर २ ग्रामपंचायतचा कौल ही आमदार शिंदे गट व माजी आमदार बागल गट यांना जनतेने दिला होता .परंतु सदस्यांच्या अंतर्गत बंडाळीतून सरपंच निवडीच्या वेळी ही ग्रामपंचायत पाटील गटाकडे गेली. एकूणच विभाजनानंतर प्रथमच निवडणूक झालेल्या या चारही ग्रामपंचायतचा कौल विद्यमान आमदार संजयमामा शिंदे गटाकडे असलेला स्पष्टपणे दिसून येतो.
वांगी नं ३ ग्रामपंचायत सरपंच पदी आमदार संजय मामा शिंदे गटाचे श्री.मयुर महादेव रोकडे यांची निवड झाली तसेच उपसरपंच पदी बागल गटाचे सौ.सुवर्णा संतोष कांबळे यांची निवड झाली.
यावेळी पंचायत समिती सदस्य श्री.सुहास नाना रोकडे, आदिनाथ चे संचालक श्री.पांडुरंग आबा जाधव, मकाई चे संचालक श्री.संतोष बप्पा देशमुख ,पै.युवराज मामा रोकडे, ग्रा.पं. सदस्य शंकर जाधव, ग्रा.पं. सदस्य चंद्रकांत कदम ,ग्रा.पं. सदस्य सोमनाथ रोकडे, दिनकर तात्या रोकडे, बापुराव शिंदे, दादा रोकडे, अनिल काळसाईत, देवा तळेकर, आनंद रोडे ,अर्जुन तकीक ,गणेश तळेकर, गिरीधर यादव, सुरेश भानवसे, दत्ता कारंडे, किसन सोनवणे, शिवाजी तळेकर, नागनाथ जाधव, विजय रोकडे, सोनज काळे,आबा सोनवणे, अल्लाउद्दीन तांबोळी, भारत तावसे, भारत रोकडे, हनुमंत भोईटे, गणपत सातव, मारुती पांढरमिसे, बाळासाहेब रोकडे,गणपत कापसे, सचिन दरेकर, सोमनाथ पांडे, पोपट शिंदे, हनुमंत आदलिंग, विशाल मोरे,भुजंग जाधव, नवा शिनगारे, मोहन सोनवणे, कुमार कांबळे, विजय निंबाळकर,सलीम तांबोळी, आनंद रोकडे, संतोष निंबाळकर ,सुनील देशमुख,अनिल पारेकर,तानाजी बळवंत,पप्पू गोडगे,नारायन भवर,हरिभाऊ रोकडे,तुषार वाघमोडे,संतोष कारंडे,राजकुमार देशमुख,अभिमान निंबाळकर यांचे व समस्त वांगी ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.