दिग्विजय बागल यांच्या प्रयत्नाने कुकडी आेव्हरफ्लोचे पाणी करमाळा तालुक्याला मिळणार- गणेश झोळ.

वाशिंबे प्रतिनिधी सुयोग झोळ
कुकडी प्रकल्पाचे ओव्हरफ्लोचे पाणी आणि निमगाव-गांगुर्डी तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे या तलावातील पाणी सिना नदीव्दारे सिना-कोळगाव धरणात व मांगी तलावासोबतच आपल्या तालुक्यातील रावगाव, भोसे, वीट, कुंभेज, कुंभारगाव, हिंगणी, पोंधवडी, पारेवाडी, सावडी, राजूरी या तलावात सोडण्यात यावे अशी मागणी मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल यांनी मुंबई येथे राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील साहेब यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदनाद्वारे केली होती,यावर राज्याचे जलसंपदा मंञी जयंत पाटील यांनी मागणीची दखल घेत प्रशासनास त्वरीत सूचना केल्या . त्यामुळे लवकरच कुकडीचे पाणी सिना नदीव्दारे सिना-कोळगाव धरणाला मिळणार आहे.व त्याच बरोबर तालुक्यातील मांगी तलावा बरोबर ईतर तलावातही पाणी मिळणार आहे,त्यामुळे दिग्विजय बागल यांच्या मागणीला यश मिळाले आहे, परंतु तालुक्यातील काही नेते मंडळी स्वत:चे अपयश झाकण्यासाठी दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत, असे करमाळा तालुका शिवसेना युवानेते गणेश झोळ यांनी सांगितले आहे.
