आध्यात्मिककरमाळा

करमाळा शहरात लिंगायत समाजाच्यावतीने 24 ऑगस्ट रोजी शिवलीलामृत पारायण सोहळ्याचे आयोजन

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरामध्ये लिंगायत समाजाच्यावतीने पवित्र श्रावण मास निमित्त परम रहस्य शिवलीलामृत पारायण सप्ताहाचे आयोजन श्रावण शुद्ध सात गुरुवार दिनांक 24 ऑगस्ट 2023 ते श्रावण शुद्ध चौदा वार बुधवार 30 ऑगस्ट 2023 या कालावधीमध्ये श्रावण मासानिमित्त ग्रंथराज परमरहस्य पारायण सोहळा आयोजित केला आहे समस्त वीरशैव  लिंगायत समाज करमाळा यांच्यावतीने हा पारायण सोहळा आयोजित केला असून समाजातील सर्व महिला पुरुषांनी या पारायण सोहळ्यातील सहभाग घेऊन गुरुकृपा प्राप्त करून घ्यावी शाळेच्या आशीर्वादाचा लाभ घ्यावा आवाहन करण्यात आले आहे. 27 ऑगस्ट 2023 रोजी श्री ष ब्र‌ १०८ मुक्तेश्वर शिवाचार्य वेळापूरकर महाराज यांची उपस्थिती राहणार असून मंगळवार दिनांक 29 ऑगस्ट 2023 रोजी श्री ष.ब्र.१०८ गुरु विरूपाक्ष शिवाचार्य मानूरकर महाराज यांची प्रमुख उपस्थिती या पारायण सोहळ्याला राहणार आहे .कार्यक्रमाची रूपरेषा रविवार दिनांक 27 ऑगस्ट 29 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी नऊ ते 11 परम रहस्य पारायण सकाळी 11 ते साडेबारा पाद्यपूजन एक ते तीन महास्वामीजी आशीर्वाचन तीन ते चार महाप्रसादाची आयोजन करण्यात आला आहे सदर शिवलीलामृत पारायण सोहळा खोलेश्वर महादेव मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे महास्वामीजी च्या पाद्यपूजनासाठी ज्या यजमानांना पाद्यपूजा करायची आहे त्यांनी संपर्क करून नाव नोंदणी करावी तसेच ज्या यजमानांना वर्गणी द्यायची आहे त्यांनी किरण स्वामी मोबाईल नंबर 99 680230 52 शेखर स्वामी 99 21 38 22 82 श्री शैल्य स्वामी 96 07 स 2100 99 संकेत पुराणिक 99 60 49 99 49 नाना तकटे 88 05 68 9001 यांच्याशी संपर्क साधून पारायण नोंदणी करावी तसेच या कार्यात तन मन धनाने सहकार्य करावे असे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे. पारायण सोहळ्याला 27 ते 29 दुपारी तीन वाजता महेश चिवटे अध्यक्ष पत्रकार संघ यांच्यावतीने अन्नदान करण्यात येणार आहे सदर महाप्रसादाचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन वीरशैव लिंगायत समाज करमाळा यांच्यावतीने करण्यात आले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group