करमाळाकृषी

राजेरावरंभा शेतकरी कंपनीच्या पाठीमागे नाशिकची सह्याद्री कंपनी ठामपणे उभी राहील मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सचिन वाळुंज यांचे प्रतिपादन .


करमाळा प्रतिनिधी
एक वर्षांपूर्वी स्थापन झालेली राजे रावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनी अल्पावधीतच अतिशय उत्तम पद्धतीने कामकाज करत असून भविष्यकाळात त्यांच्या पाठीशी आमची सह्याद्री ऍग्रो प्रोडूसर कंपनी ठामपणे उभी राहील. राजे रावरंभा शेतकरी कंपनीला लागणारी खते, केळीची रोपे याबरोबरच सभासदांनी उत्पादित केलेला माल निर्यात करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य सह्याद्री कंपनीकडून केले जाईल असे प्रतिपादन श्री सचिन वाळुंज यांनी केले. निमित्त होते राजे रावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनीच्या पहिल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे व ॲग्रो मॉल उद्घाटनाचे .
याप्रसंगी व्यासपीठावर तालुका कृषी अधिकारी श्री संजय वाकडे, रानडे ऍग्रो चे संचालक डॉ. संजय गुंड, विग्रो कंपनीचे सीनियर मॅनेजर अनंत कंगले ,नायब तहसीलदार बाबासाहेब गायकवाड ,वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्टचे कांतीलाल गीते ,समिना पठाण, अभिजीत शिंदे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना ते म्हणाले की एप्रिल 2023 पासून राजे रावरंभा शेतकरी कंपनीने सह्याद्री कंपनीची डीलरशिप घेतली असून त्या माध्यमातून वॉटर सोल्युबल खते खरेदी करण्याचे काम ही कंपनी करत आहे. अल्पावधीतच त्यांनी खरेदी विक्री जैन ठिबक पाईप यांची विक्री तसेच केळी निर्यात करणे यामध्ये काम सुरू केले असून भविष्यकाळात राजे रावरंभा शेतकरी कंपनीसाठी जी मदत लागेल ती सर्व मदत, मार्गदर्शन व सहकार्य सह्याद्री कंपनीकडून केले जाईल.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कंपनीचे अध्यक्ष डॉ. विकास वीर यांनी केले .सूत्रसंचालन श्री अरुण चौगुले यांनी केले. याप्रसंगी रानडे ऍग्रो चे डॉ.संजय गुंड, नायब तहसीलदार बाबासाहेब गायकवाड , विग्रो कंपनीचे अनंत कंगले,आदिनाथ कारखान्याचे माजी संचालक पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. अध्यक्षीय मार्गदर्शन तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी आमदार संजयमामा शिंदे मोटर वाहतूक संस्थेचे सचिव सुजित तात्या बागल, लिंबेवाडी चे सरपंच किरण फुंदे, मामासमर्थक मकाईचे माजी संचालक विवेक येवले, शिक्षक नेते तात्यासाहेब जाधव, केळी निर्यातदार बालाजी पाटील यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सभासदांना शेअर सर्टिफिकेटचे वाटपही करण्यात आले. आभार प्रा. बिभीषण मस्कर यांनी मानले.

चौकट-
राजे रावरंभा कंपनीचे कार्य कौतुकास्पद – संजय वाकडे तालुका कृषी अधिकारी करमाळा.
स्थापना झाल्यापासून राजे रावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनीने शेतकऱ्यांचे एकरी केळीचे उत्पादन 45 टनापेक्षा अधिक यावे या दृष्टीने माती परीक्षण करण्यापासून ते खत व्यवस्थापन कसे असावे याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे व्हावेत, केळी पीक परिसंवाद ,शेतकरी अभ्यास सहल, संचालकांचे प्रशिक्षण या माध्यमातून ते नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करत आहेत. कंपनीचे हे कार्य निश्चितच कौतुकास्पद असून या कंपनीने केलेल्या कामाची दखल केंद्र सरकारने सुद्धा घेतलेली आहे.या कंपनीचा भविष्यकाळ निश्चितच उज्वला असून भविष्यकाळात ही कंपनी शेतकऱ्यांसाठी जे उपक्रम राबविणार आहे त्यासाठी कृषी विभागाचे संपूर्ण सहकार्य राहील अशी ग्वाही त्यांनी दिली.

error: Don\'t try to copy. Content is protected !!