भाजप शहराध्यक्ष जगदिश अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम
करमाळा प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीचे करमाळा शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार दिनांक 26 ऑक्टोंबर रोजी विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून दत्त पेठ येथील समंतभद्र मंगल कार्यालयामध्ये हे कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती केशव भाजप शहराध्यक्ष जगदिश अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष रविराज पठाडे व संचालक सचिन कणसे यांनी दिली आहे.या कार्यक्रमाला पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे, राज्य शिखर बँकेचे संचालक अविनाश महागावकर, करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे व करमाळा तालुक्यातील व शहरातील सर्व राजकीय मान्यवर व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमाचे या कार्यक्रमांमध्ये रक्तदान शिबिर, मोफत नेत्ररोग तपासणी शिबिर, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, मोबाईल आधार लिंकिंग शिबिर व बँकेच्या विविध योजनांचे सेवा केंद्र व करमाळा तालुक्यातील प्रसिद्ध चित्रकार रवी प्रतिक जाधव यांच्या चित्राचे भव्य प्रदर्शन होणार आहे. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
