मकाई यंदाचा गळीत हंगाम यशस्वीपणे पार पाडणार- दिग्विजय बागल
करमाळा प्रतिनिधी श्री मकाई सहकारी साखर कारखाना यंदाचा गळीत हंगाम यशस्वीपणे पार पाडणार असल्याचे कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल यांनी सांगितले. आज कारखान्याच्या २० व्या बाॅयलरचे पूजन कारखान्याचे व्हाईस चेअरमन अँड. ज्ञानदेव देवकर यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी आपल्या भाषणात बागल म्हणाले की, यंदा आम्ही साडेतीन लाख ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. मकाई हा सभासदांचा विश्वास असणारा कारखाना आहे. या कारखान्याने नेहमीच शेतकरी हित जपले आहे. मकाई कारखाना यंदा चालूच होऊ नये म्हणून विरोधकांनी देव पाण्यात ठेवले होते. परंतु कोणत्याही परिस्थितीत कारखाना चालू करून यंदाचा हंगाम आम्ही यशस्वी पार पाडून दाखवू. यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन अँड. ज्ञानदेव देवकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रस्तावित कारखान्याचे कार्यकारी संचालक हरिश्चंद्र खाटमोडे यांनी केले तर आभार संचालक संतोष देशमुख यांनी मानले. यावेळी कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन बाळासाहेब पांढरे, बाजार समितीचे उपसभापती चिंतामणी जगताप, संचालक महादेव गुंजाळ, नंदकुमार भोसले, महादेव सरडे, संतोष देशमुख, सुनिल लोखंडे, दत्तात्रय गायकवाड, संतोष पाटील, गोकुळ नलवडे, बापू कदम, बाळासाहेब सरडे, रघुनाथ फडतरे माजी संचालक काशिनाथ काकडे यांच्या सह कारखान्याचे सर्व अधिकारी, कर्मचारी आणि शेतकरी सभासद उपस्थित होते.यंदा मकाई चालू होऊ नये म्हणून विरोधकांनी देव पाण्यात ठेवले होते. आम्ही कठीण परिस्थितीत कारखाना चालू करून यशस्वीपणे हा गळीत हंगाम पार पाडणार आहोत. यावर्षी मकाईच्या सभासदांसाठी २५ किलो साखर ३१ रुपये किलो या भावाने उपलब्ध करून देत आहोत. कार्यक्षेत्रातील सर्व ऊस आपल्या कारखान्याकडे गाळप करण्यासाठी सभासदांनी सहकार्य करावे… दिग्विजय बागल, चेअरमन, श्री मकाई सहकारी साखर कारखाना.
