मुस्लिम बागवान समाजाचे जगताप गटाशी अतुट नाते- जयवंतराव जगताप
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरालगत असणाऱ्या अथर्व मंगल कार्यालय येथे बागवान समाजाचा मेळावा संपन्न झाला या मेळाव्याला मार्गदर्शन करताना जयवंतराव जगताप यांनी बागवान समाज तसेच समस्त मुस्लिम समाज यांच्याशी जगताप गटाचे असणारे अतूट नात्याचा उल्लेख केला पिढ्यानुपिढ्या हा समाज जगताप गटाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतो अशा या उपेक्षित समाजाचा मला सार्थ अभिमान आहे असे यावेळी बोलताना ते म्हणाले. तसेच या कार्यक्रम प्रसंगी करमाळा नगरीचे नगराध्यक्ष वैभव जगताप यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी बागवान समाज हा कष्ट करणारा समाज असून त्यांनी मुलांना उच्चशिक्षित केले. त्यामुळे बागवान समाजामध्ये डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक यासारखे उच्चशिक्षित तरुण दिसू लागले हे उल्लेखनीय आहे. कार्यक्रम प्रसंगी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये पदोन्नती व नावलौकिक मिळालेले महात्मा गांधी विद्यालयाचे उपप्राचार्य आनिस हुसेन बागवान, मंडलाधिकारी युसुफ बागवान, अरबाज लाल मोहम्मद बागवान ,शहाबाज बागवान, नदीम असलम बागवान ,अब्रार अल्ताफ बागवान, आदींचा जयवंतराव जगताप यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला..यावेळी युवा नेते शंभूराजे जगताप, उपनगराध्यक्ष अहमद कुरेशी, नगरसेवक श्रेणीक खाटेर, प्रशांत ढाळे ,माजी नगरसेवक नजीर अहमद कुरेशी , शकील बागवान , अलिम बागवान, डॉक्टर बागवान ,परवेज बागवान, जाफर घोडके जोतिराम ढाणे.शरीफ बागवान बागवान अहमद गुलाब बागवान जमीन काझी हुसेन बागवान बागवान फिरोज बागवान आदी उपस्थित होते.
