पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या समस्या व तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवणार – पांडे येथील सभेत दिग्विजय बागल यांचे प्रतिपादन
करमाळा प्रतिनिधी पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या समस्या व तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवणार ॶसल्याचे पांडे येथील जाहीर सभेत दिग्विजय बागल यांनी केले आहे .करमाळा तालुक्याचा पूर्व भाग सिंचनाखाली येत असताना शेतकऱ्यांना असंख्य समस्या भेडसावत आहेत. या भागातील तरूण हे रोजगाराच्या प्रतिक्षेत आहेत त्यामुळे संभाव्य समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी शेती संबंधीत सुविधांसह शेतमाल प्रक्रिया उद्योग आदिंबाबत नाविन्यपूर्ण योजना विचाराधिन आहेत.यासाठी शासनस्तरावरून सहकार्य घ्यावे लागणार आहे. आगामी निवडणुकीत मतदारांनी आपला विजय निश्चित केल्यावर आपण स्वतः पाठपुरावा करून येथील स्थानिक प्रश्नांची सोडवणूक करत सर्व बाबींची प्रत्यक्ष अंमलबजावणी करू.जनतेच्या पाठबळावर लोकप्रतिनिधी म्हणून सर्व करमाळावासियांचे जीवनमान उंचाऊन तालुक्याच्या वैभवात भर घालू असे महायुती शिवसेनेचे उमेदवार दिग्विजय दिगंबरराव बागल यावेळी म्हणाले.पांडे गावातील अबालवृद्धांनी दिग्विजय भैय्यांचे तोफांची सलामी देत जल्लोषात स्वागत केले. या प्रचार सभेसाठी महायुतीच्या मान्यवर पदाधिकाऱ्यांसह असंख्य कार्यकर्ते व पांडे सह परिसरातील मतदार ग्रामस्थ मोठया संखेने उपस्थित होते.
