देवळाली येथील नवरात्र उत्सव उत्साहात संपन्न
*देवळाली प्रतिनिधी ग्रामिण भागात सामाजिक एकतेचे बांधिलकीचे दर्शन घडविणारा सण म्हणजे नवरात्र उत्सव या उत्सवानिमित्त श्री क्षेत्र तुळजापूर येथून मशाल ज्योत देवळाली पर्यंत तरुणांनी चालत आणुन गावात प्रतिष्ठापना करण्यात आली नऊ दिवस चालणारा हा उत्सव सर्वांनी आनंदाने साजरा केला यामध्ये आराध्यांची गाणी हे प्रमुख आकर्षण दिसून आले
विजयादशमी दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन करून गावातून देवीची यात्रा काढण्यात आली यावेळी देवळाली गावातील कै. कल्याणभाऊ गायकवाड तरुण मंडळ यांनी सहभागी होत यात्रा उत्सवात पार पाडली.*
