Friday, January 10, 2025
Latest:
करमाळा

करमाळा तालुक्यातील पत्रकारीता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असल्याने त्यांना सन्मानित करण्याचा ‌ सार्थ अभिमान- भरत भाऊ आवताडे

करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून पत्रकार दिनानिमित्त त्यांचा सत्कार करण्याचा आम्हाला सार्थ अभिमान असुन पत्रकारांच्या कल्याणासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार मत करमाळा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भरत भाऊ अवताडे यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाच्यावतीने करमाळा तालुक्यातील पत्रकार बांधवांचा पत्रकार दिनानिमित्त ‌ सत्कार व सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास करमाळा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते ॲड अजित विघ्ने राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड जिल्हा उपाध्यक्ष आशपाक जमादार उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना भरत भाऊ अवताडे म्हणाले की ‌ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ‌ उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तालुक्याचे‌‌ माजी आमदार संजयमामा शिंदे ‌ यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तालुक्यात काम करत असून संजयमामा शिंदे यांनी करमाळा तालुक्यामध्ये 3000 कोटीची विकास कामे केली असल्यामुळे याची पोचपावती ‌ विधानसभेला जनता मतरूपी देऊन संजयमामांना मताधिक्याने विजयी करणार ‌असे आम्हाला वाटत होते. परंतु ‌ मत विभागणीमुळे ‌ पक्षीय गटातटाच्या राजकारणामुळे मामांचा ‌ पराभव झाला .विधानसभेला जरी संजय मामाचा पराभव झाला असला तरी ‌ आम्ही करमाळा तालुक्याच्या विकासासाठी आम्ही सदैव कटिबध्द राहुन काम करणार आहे. पत्रकारांच्या पाठबळामुळेच त्यांनी लेखणीतून दिलेल्या प्रसिद्धीमुळेच करमाळा तालुक्यामध्ये विकास कामे झाली असून यापुढेही आम्ही नवीन जोमाने करमाळा तालुक्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा तालुक्यामधील रखडलेली विकास कामे भरघोस निधी मंजूर करून आणून करणार आहोत त्यामुळे कार्यकर्त्यांनी खचून न जाता इथून पुढच्या निवडणुकीसाठी सज्ज रहावे. राज्यामध्ये आपली सत्ता असल्यामुळे तन-मन धनाने कामाला लागावे येणारा काळ नक्कीच आपला उज्वल असणार असून संजयमामा शिंदे यांना नक्कीच अजितदादा पवार मोठी संधी देऊन करमाळा तालुक्याचा सर्वांगीण विकासासाठी ताकद देणार आहेत असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भरत (भाऊ )अवताडे यांनी व्यक्त केला आहे . याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते ॲड अजित विघ्ने, सोलापूर राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड ,जिल्हा उपाध्यक्ष आशपाक जमादार यांनी करमाळा तालुक्यातील पत्रकार बांधवांच्या पत्रकारितेचे कौतुक करून पत्रकार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमांमध्ये पत्रकार सुहास घोलप‌ यांनी पत्रकारांच्या संघर्षमय जीवनाचे खरे वास्तव आपल्या मनोगतांमध्ये व्यक्त करून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून ‌ काम करणाऱ्या पत्रकारांना समाजाने राजकर्त्यांनी ‌ व शासनाने ‌ पाठबळ देऊन ‌ सहकार्य करून न्याय देण्याचे आवाहन त्यांनी केले. ‌ ‌पत्रकादिनानिमित्त पत्रकार आशपाक सय्यद सुहास घोलप,आण्णा काळे,अशोक नरसाळे, दिनेश मडके डी.जी पाखरे, जयंत दळवी सचिन जव्हेरी, सचिन हिरडे ,शितलकुमार मोटे, विशाल घोलप, शंभुराजे फरतडे, हर्षवर्धन गाडे, सिद्धार्थ वाघमारे,सुनील भोसले, विशाल परदेशी,सूर्यकांत होनप, तुषार जाधव यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शाल पेन डायरी देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास पत्रकार बांधव राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!