कुकडीच्या पाण्यासाठी संतोष वारे यांच्या नेतृत्वाखाली जातेगाव येथे रस्ता रोको आंदोलन
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील जातेगाव येथे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (ता. २७) कुकडीच्या पाण्यासाठी नगर- टेंभुर्णी रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
कुकडीचे हक्काचे पाणी मिळाले पाहिजे या प्रमुख मागणीसाठी हे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. यावेळी कुकडीचे शाखा अभियंता साळुंखे, केतकी, मेहर यांनी कुकडीच्या संबंधित वरिष्ठांशी बोलून पाणी सोडण्यासाठी नियोजन करू असे सांगितले. तेव्हा मांगी तलावातही पाणी न सोडल्यास तीव्र आंदोलन करून. मांगी परिसरा सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बंद ठेवण्यात येतील, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला आहे.
यावेळी राष्ट्रवादीचे सचिन नलवडे, विठ्ठल शिंदे, कामोणे येथील रमेश पाटील, खडकीचे बळी शिंदे, वडगावचे चंद्रकांत काळे, पंकज नलवडे, पुनवरचे अनिल नरसाळे, पिनू नरसाळे, बाळासाहेब भालेराव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुदर्शन शेळके, उदयसिंह नलवडे, संदीप नलवडे, कुमार नलवडे, छगन लगस, अशोक वारे, राहू वारे, गहिनाथ रोडगे, लक्ष्मण काळे, बाबासाहेब भालेराव, गणेश शिंदे, कृष्णा भिसे, गोकुळ शिंदे, भाऊ नलवडे, पांडुरंग नलवडे, अशोक कराळे, पोपट पवार, देविदास पवार, भाऊ गाडवे, शिवाजी नलवडे, औदुंबर नलवडे, गोपाळ गुरव, डॉ. पप्पू नलवडे, अशोक लवंगरे, बलभीम धगाटे, महादेव गायकवाड, संदीप शेळके, दिलिप काकडे, बाळासाहेब जगताप, लक्ष्मण काळे यांच्यासह या भागातील अनेक शेतकरी उपस्थित होते. यावेळी कुकडीचे अधिकारी व महसूलचे कर्मचारी उपस्थित होते. अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मिटू जगदाळे यांनी बंदोबस्त ठेवला होता.
