Tuesday, April 22, 2025
Latest:
करमाळाराजकीय

करमाळा पंचायत समिती गणासाठी ‘असे’ असणार आरक्षण….

करमाळा पंचायत समिती गणासाठी ‘आसे’ असणार आरक्षण….
करमाळा प्रतिनिधी  करमाळा पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी गुरुवारी (ता. 28) पंचायत समितीच्या सभागृहात आरक्षण सोडत झाली. रावगाव, पांडे, हिसरे, वीट, कोर्टी, केत्तूर, चिखलठाण, उमरड, जेऊर, वांगी, साडे व केम या पंचायत समीतीच्या गणासाठी ही आरक्षण सोडत झाली.
नियंत्रक अधिकारी म्हणून भूसंपादनच्या उपजिल्हाधीकारी अरुणा गायकवाड व तहसीलदार समीर माने यांच्यासह नायब तहसीलदार विजयकुमार जाधव, सुभाष बदे, संतोष गोसावी आदी अधिकारी उपस्थित होते.
चंद्रकांत सरडे, संतोष वारे, देवानंद बागल,भाजपचे नरेंद्रसिंह ठाकूर, राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते, देवानंद बागल, सुनिल सावंत, चंद्रशेखर जोगळेकर,धनाजी ननवरे,अशोक सरडे,राजू कांबळे,उदय ढेरे आदी उपस्थित होते. करमाळा तालुक्यात एसी 2 जागा त्यापैकी एक महिलांसाठी, स्त्रीयांसाठी 6 जागा असणार आहेत. ओबीसीसाठी 3 जागा असणार आहेत त्यापैकी 2 जागा महिलांसाठी असणार आहेत. हे आरक्षण चक्रानुक्रमाप्रमाणे काढण्यात आले. 2002 पासूनच्या निवडणुकीच्या निवडणुकीचे आरक्षण पाहुन हे आरक्षण सोडत करण्यात आली.
अनुसुचित जातीसाठी (एसीसाठी) उमरड व वांगी हे गण असणार आहेत. नागरिकांचा मागास वर्गसाठी (ओबीसी) जेऊर व केम एका जागाएसाठी चिठ्ठी टाकण्यात आली त्यात (रावगाव, वीट व साडे) वीट हे आरक्षीत असणार आहे.
तर रावगाव, पांडे, हिसरे, कोर्टी, केत्तूर, चिखलठाण, साडे सर्वसाधारणसाठी असणार आहे. त्यापैकी महिलांसाठी अनुसुचित जागेसाठी उमरड व वांगीपैकी उमरड हे महिलेसाठी तर वांगी सर्वसाधारणसाठी असणार आहे.
ओबीसीसाठी केम व वीट गणासाठी एखदाही महिलांसाठी आरक्षण देण्यात आले नव्हते त्यामुळे तेथे थेट आरक्षण देण्यात आले.सर्वसाधारण महिलांठी 7 गण आहेत. त्यापैकी पांडे, कोर्टी, केत्तूर व चिखलठाण येथे एखदाही महिला आरक्षण देण्यात आले नाही. त्यामुळे येथे चिट्टी टाकुन आरक्षण काढण्यात आले. त्यात कोर्टी, चिखलठाण व पांडे हे गण महिला सर्वसाधारणसाठी राहणार आहे. याबरोबर रावगाव सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असणार आहे.यावर आक्षेप असतील तर 2 ऑगस्टपर्यंत घेता येणार आहेत.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group