जिल्हापरिषद सोलापुर, पंचायत समिती करमाळा यांचे पॅनल ॲडव्होकेट पदी ॲड. अजित विघ्ने यांची निवड
करमाळा प्रतिनिधी जिल्हापरिषद सोलापुर, पंचायत समिती करमाळा यांचे पॅनल ॲडव्होकेट पदी ॲड. अजित विघ्ने यांची निवड करण्यात आली असुन, ते करमाळा न्यायालयात जिल्हा परिषद, पंचायत समितीचे कायदेविषयक कामकाज पाहणार आहेत. या निवडीबद्दल त्यांचे विविध स्तरातुन अभिनंदन करण्यात आले. आमदार. संजयमामा शिंदे, गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी या निमित्त शुभेच्छा दिल्या असुन, ॲड. अजित विघ्ने यांनी यापुर्वी जलसंपदा विभाग, स्टेट बँक ऑफ इंडिया, भैरवनाथ शुगर्स यांचेही विधि सल्लागार म्हणुन काम पाहीलेले आहे.
