करमाळासकारात्मक

संजय सरवदे यांच्या मागणीला यश… संगोबा ते घारगाव मुख्य रस्त्याचे दुरुस्तीचे काम चालू* साप्ताहीक पवनपुत्रचा इम्पॅक्ट


करमाळा प्रतिनिधी संगोबा ते घारगाव पर्यंत रस्त्यावर खड्डेच खड्डे झालेले होते. त्यामुळे नागरिकांना शेतकऱ्यांना व शालेय विद्यार्थ्यांना प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत होती रस्ता मराठवाड्याला जोडला गेलेला आहे या रस्त्यावरून सारखी रहदारी चालू आहे नाहक सर्वांना याचा त्रास होत होता सदरचा रस्ता मराठवाड्यातील परांडा भूम धाराशिवला जोडणारा आहे सदर रस्त्यावर मराठवाड्यात जाणाऱ्या वाहनांची बऱ्यापैकी ये जा होत असते रस्त्याचे खड्डे बुजवावेत अशी मागणी घारगावचे सामाजिक कार्यकर्ते संजय सरवदे यांनी मागणी केली होती.
तरी प्रशासनाने याकडे लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही केली असुन खड्डे बुजवण्याचे काम केले आहे. घारगावचे सामाजिक कार्यकर्ते श्री संजय सरवदे यांचे ग्रामस्थांकडून व नागरिकांकडून कौतुक होत आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!