करमाळा

वांगी नं 3 येथे सोन्याच्या दागिन्याची चोरी तीन चोरट्याविरुध्द गुन्हा एकाला पकडण्यात पोलिसांना यश

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील वांगी नं 3 येथे तीन चोरट्यानी दरवाजाचे कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश करून स्वयंपाक खोलीतील कपाटामध्ये ठेवलेल्या दागिन्याची चोरी केली आहे.दोन लाख एक्कोण्णोतीस हजार पाचशे दागिन्याची चोरी झाली असुन याबाबत धनंजय किसन तळेकर रा.वांगी 3 यांनी फिर्याद दिली असुन पोलिस निरिक्षक सुर्यकांत कोकणे यांनी माहिती दिली आहे. यामध्ये अडीच तोळ्याचे सोन्याचे गंठन किमंत रूपये,70,500/- रु. दीड तोळ्याची सोन्याची फुलं व झुबे किंमत रुपये23,500/- रू. ची अर्धा तोळा सोन्याची पिळ्याची अंगठी किमंत रूपये. 14,000/- रू. चे तीन ग्रॅम सोन्याचे मणी किमत रुपये.4,000/- रूपये रोख रक्कम त्यामध्ये 500 रूपये दराचे 02 व 100 रूपये दराचे 30 चलनी नोटा.एकूण – 2,29,500/-* या वर्णनाचे सोन्याचे दागिणे व रोख रक्कम हे लबाडीने चोरून नेलेले आहेत.याबाबतीत भा.द.वि. कलम 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन‌ एका आरोपिला पकडण्यात यश आले आहे पुढील तपास सपोनि जगताप हे करीत आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group