करमाळ्यातील वैष्णवी पाटिलची राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड
करमाळा प्रतिनिधी अकलूज जिल्हा सोलापूर येथे शालेय राज्यस्तरीय आर्चरीच्या सतरा वर्ष वयोगटाखालील स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये इंडियन राउंड प्रकारात करमाळा तालुक्यातील वरकुटे येथील वैष्णवी पाटील या विद्यार्थिनीने वैयक्तिक एक कांस्य व सांघिक सुवर्णपदक मिळविले आहे. या यशाने राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिची निवड झालेली आहे.
पाटील सध्या गुरुकुल पब्लिक स्कूल या शाळेमध्ये इयत्ता नववीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. तर मोडनिंब तालुका माढा या ठिकाणी धनुर्विद्या या खेळाचा सराव करत आहे. तिला प्रशिक्षक विठ्ठल भालेराव यांचे मार्गदर्शन मिळत आहे. या स्पर्धेत 40 मीटर अंतरावरून खेळताना 360 पैकी 328 गुण मिळवून ती तिसऱ्या क्रमांकावर राहिली.
या अगोदर पुणे येथे झालेल्या शालेय विभागीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला होता. यापूर्वी गोवा येथे झालेल्या जुनियर नॅशनल स्पर्धेमध्ये वैयक्तिक तीन रौप्य पदके व एक सांघिक सुवर्णपदक देखील मिळवलेले आहे. या यशाबद्दल सर्व स्तरातून वैष्णवीचे कौतुक होत आहे.
–
