करमाळा

वाशिंबे ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी अमोल पवार यांची बिनविरोध निवड

करमाळा प्रतिनिधी

वाशिंबे ग्रामपंचायत कार्यालय येथे लोकनियुक्त सरपंच तानाजी बाप्पू झोळ यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच निवड घेण्यात आली या वेळी उपसरपंच पदासाठी अमोल पवार यांचा एकमेव अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बनसोडे साहेब यांनी काम पहिले या निवडीसाठी नूतन ग्रामपंचायत सदस्य शोभा शहाजी शिंदे, वैशाली विजय पाटील,रुपाली धोंडीराम कळसाईत,प्रिया अजित रणदिवे, तुकाराम डोंबाळे, श्रीहरी टापरे, शिवराज झोळ ग्रामसेवक गाडेकर भाऊसाहेब व गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होतेे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!