करमाळा शहर व तालुक्यात १६ सप्टेंबर रोजी ७० कोरोना पाॅझिटिव्ह

करमाळा प्रतिनिधी. करमाळा शहर व तालुक्यात १६ सप्टेंबर रोजी एकूण ४१९ ॲंटिजिन रॅपिड टेस्ट घेण्यात आल्या. यामध्ये ७० जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून यात ४० पुरुष तर ३० महिलांचा समावेश आहे. आज करमाळा शहरात १४० ॲंटिजिन रॅपिड टेस्ट मध्ये २८ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर ग्रामीण भागात २७९ ॲंटिजिन रॅपिड टेस्ट मध्ये ४२ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. . करमाळा शहरात कुंकू गल्ली २,पुरुष सुमंतनगर १ , पुरुष,१ महिला कानाडगल्ली १ पुरुष, २ महिला रेस्टहाऊस १ ,पुरुष कृष्णाजीनगर १ पुरुष, एम.एस.ई.बी. १ ,पुरुष, १, महिला ,बालाजीनगर १ पुरुष, गुजरगल्ली १ महिला, हिरडे प्लॉट २ महिला मेनरोड १ ,महिला
शिवाजीनगर १ पुरुष, १ महिला गणेशनगर १ पुरुष, २ महिला शिंदे हॉस्पिटल १ पुरुष सिद्धार्थनगर १ महिला किल्ला विभाग १ पुरुष विद्यानगर १ पुरुष सावंतगल्ली १ पुरुष यांचा समावेश आहे तर ग्रामीण भागामध्ये ४२ कोरोना पाॅझिटिव्ह असुन यामध्ये कात्रज १ महिला ,घोटी १ पुरुष, १ महिला ,देलवडी १ पुरुष रावगाव १ पुरुष , आळजापूर १ पुरुष ,धायखिंडी १ महिला
शेटफळ १ पुरुष, १ महिला, हिसरे १ पुरुष
कुंभेज १ महिला ,वांगी नं ३ (६ पुरुष) केम १ महिला ,वीट २ पुरुष १ महिला शेलगाव वांगी ८ पुरुष, ८ महिला ,वांगी नं १ (२ पुरुष,१ महिला) प्रशासनाने दिलेल्या नियमांचे कायम उल्लंघन होत आलेले आहे. आज जेऊर (ता.करमाळा) येथील ९० वर्षाच्या पुरुषाचे निधन झाले आहे. आजपर्यंत करमाळा तालुक्यात एकूण २३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. करमाळा तालुक्यातील आजपर्यंत एकूण कोरोनाबाधितांची संख्या १४४७ वर जावून पोहोचली आहे.
