Monday, April 21, 2025
Latest:
करमाळाताज्या घडामोडी

करमाळा शहर व तालुक्यात १५ सप्टेंबर रोजी २९ कोरोना पाॅझिटिव्ह

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहर व तालुक्यात १५ संप्टेबर रोजी  एकूण २९८ ॲंटिजिन रॅपिड टेस्ट घेण्यात आल्या. यामध्ये २९ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून यात २० पुरुष तर ९ महिलांचा समावेश आहे. आज करमाळा शहरात १२० ॲंटिजिन रॅपिड टेस्ट मध्ये ८ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह यामध्ये   गुजरगल्ली २ पुरुष, मंगळवार पेठ १, पुरुष एस.टी.कॉलनी १, पुरुष गणेशनगर १, पुरुष एम.एस.इ.बी. १ पुरुष, राशीन पेठ १ महिला ,मेनरोड १ पुरुष तर ग्रामीण भागात १७८ ॲंटिजिन रॅपिड टेस्ट मध्ये २१ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे . यामध्ये पिंपळवाडी १ ,पुरुष साडे १पुरुष, मोरवड १ पुरुष वाशिंबे १ पुरुष२महिला, पाडळी ३ पुरुष, २महिला, श्रीदेवीचामाळ१महिला, गुळसडी १ पुरुष जेऊर २ पुरुष, १ महिला वीट १ पुरुष,  १महिला, कात्रज १पुरुष१महिला देवळाली१पुरुष  आज शहरातील कोरोनाबाधितांची संख्या कमी असून ग्रामीण भागातील अजून वाढतच आहे. आज तब्बल ४१ जणांना डिस्चार्ज  दिला असून आजपर्यंत ८७७ कोरोनाबाधीत रुग्ण बरे होवून घरी सोडले आहे. सध्या ४७८ जणांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत तालुक्यात एकूण २२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. करमाळा तालुक्यातील आजपर्यंत एकूण कोरोनाबाधितांची संख्या १३७७ वर जावून पोहोचली आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group