Monday, April 21, 2025
Latest:
सकारात्मकसोलापूर जिल्हा

सोलापूर जिल्ह्यात बोगस खत कंपन्यांचा सुळसुळाट  अनावश्यक खते शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचा दुकानदारांचा प्रयत्न 2 डिसेंबर रोजी हलगीनाद आंदोलन करण्याचा जनशक्तीने दिला इशारा

 

करमाळा प्रतिनिधी

कृषी विभागातील गुण नियंत्रण विभाग, खत दुकानदार, आणि खत कंपन्या यांची आर्थिक सांगड असल्याने कृषी विभाग बोगस कंपन्यांना पाठीशी घालत खत दुकानदार बोगस खते शेतकऱ्यांच्या माथ्यावर मारण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत. शिवाय एका सोबत दोन घ्या अशा अशा स्कीम मुळे शेतकऱ्यांना अतिशय त्रास होत आहे. या स्कीम मुळे आणि बोगस खतांमुळे दुकानदार मालामाल आणि शेतकरी कंगाल अशी परिस्थिती झाली असून कृषी विभागाने याकडे लक्ष द्यावे अन्यथा २ डिसेंबर रोजी जिल्हा कृषी कार्यालय येथे बेमुदत हलगीनाथ आंदोलन करण्याचा इशारा जनशक्ती संघटनेचे अतुल खूपसे पाटील यांनी दिला.

या दिलेले निवेदनात पुढे ते म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यातील जवळपास सर्रास दुकानांमध्ये बोगस खतांची विक्री मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. ह्या कंपनीदेखील सोलापूर जिल्ह्यात उदयास आले आहेत. लिंबोळी पासून बनवणारे खत, जैविक खत, पी डी एम पोटॅश खत असे अनेक खते कुठल्याही लॅब मध्ये चेक न करता आकर्षित पॅकिंग करून त्याच्यावर खोटी टक्केवारीची मात्रा लिहिली जाते. दुकानदारांना माहिती असून देखील तो अशा बनावट पॅकिंगच्या वस्तू विक्रीसाठी ठेवतो. यामुळे शेतकऱ्यांची मोठी आर्थिक फसवणूक होते.

एकीकडे ओल्या दुष्काळामुळे शेतकरी घायकुतीला आला आहे. तर दुसरीकडे बोगस खते आणि लिंकिंग खते देऊन शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड लावण्याचा प्रकार दुकानदारांमधून होत आहे. या परिस्थितीमुळे दुकानदार चांगलेच मालामाल होताना दिसत आहेत तर शेतकरी यामुळे देशी दढीला लागल्याने कंगाल होत आहे.

सोलापूर जिल्ह्यातील अशा दुकानदारावर कृषी कार्यालयाने वेळोवेळी लक्ष ठेवून प्रसंगी कारवाई करून दुकाने सील केली पाहिजे. मात्र कृषी विभाग, बोगस खत कंपन्या आणि खत दुकानदार यांची आर्थिक सांगड असल्याने तेरी ‘भी चुप मेरी भी चुप’ असा प्रकार सुरू आहे. त्यामुळे दिवसाढवळ्या शेतकऱ्यांच्या डोक्यात दगड घालण्याचे प्रकार होत आहे. अशा बोगस कंपन्या आणि खत दुकानदाराकडे जिल्हा कृषी कार्यालय आणि तालुक्यातील तालुका कृषी कार्यालयाने लक्ष द्यावे आणि त्यांच्यावर कारवाई करावी. अन्यथा २ डिसेंबर रोजी जिल्हा कृषी कार्यालयाच्या बाहेर बेमुदत हलगी नाद आंदोलन करणार असल्याचा इशारा जनशक्ती संघटनेचे अतुल खूपसे पाटील यांनी दिला आहे.

यावेळी गणेश वायभासे, अतुल राऊत,शरद एकाड,बालाजी तरंगे,किशोर शिंदे,रामराजे डोलारे ,अजीज सय्यद,साहेबराव इतकर,बालाजी तरंगे,अक्षय देवडकर,कल्याण गवळी ,नवनाथ ढेरे,कैलास ढेरे,नयन मस्के,अक्षय मस्के,चंदू डोलारे,ऋषी जगदाळे ,राणा वाघमारे,बंडू शिंदे उपस्थित होते.

▪️

 

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group