Tuesday, April 22, 2025
Latest:
करमाळाराजकीयसोलापूर जिल्हा

करमाळा तालुक्याला जिल्हाप्रमुखाचा सन्मान पत्रकार महेश चिवटे यांची शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुखपदी निवड

करमाळा प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार महेश चिवटे यांची शिवसेनेच्या (शिंदे गट) जिल्हा प्रमुखपदी निवड झाली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केले तेव्हापासून चमहेश चिवटे हे त्यांच्याबरोबर होते. शिवसेना उपप्रमुख असताना त्यांनी अतिशय ठामपणे ते भूमिका मांडत होते. त्यांनी नुकतीच करमाळा तालुक्यात कार्यकरणीही जाहिर केली होती. शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्याच्या दुसऱ्यादिवशी चिवटे यांनी त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या होत्या. त्यांचा एकनाथक शिंदे यांच्याशी थेट संपर्क आहे.
महेश चिवटे यांची शिंदे गटाचे शिवसेना सचिव संजय मोरे यांनी नियुक्ती केली आहे. बुधवारी त्यांना या निवडीचे पत्र देण्यात आले आहे. माढा, करमाळा व माळशिरस या तालुक्यांमध्ये त्यांचे कार्यक्षेत्र असणार आहे. एक वर्षासाठी त्यांची ही निवड असणार आहे.शिंदे यांनी बंड करण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या शिवसेनेत चिवटे हे उपजिल्हा प्रमुख होते. मात्र तेव्हाही ते मुख्यमंत्री शिंदे यांचे समर्थक होते.
महेश चिवटे हे मुख्यमंत्री शिंदे यांचे अत्यंत जवळचे कार्यकर्ते मानले जातात.त्याचे बंधु मंगेश चिवटे हे वैद्यकिय कक्षाचे प्रमुख मुख्यमंत्र्याचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे यांचे जेष्ठ बंधू् आहेत महेश चिवटे हे कमलादेवी औद्यागिक वसाहतीचे चेअरमन करमाळा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष असुन यशस्वी उद्योजक असुन त्यांच्या निवडीचे स्वागत होत असुन त्यांचे सर्वच क्षेत्रातील मान्यवराकडुन अभिनंदन होत आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group