मा. आमदार नारायण आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कुगांव येथे 66 रक्तदात्यांचे रक्तदान
कुगाव प्रतिनिधी लोकनेते माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कुगाव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते नारायण आबा पाटील मित्र मंडळ आणि युवा नेते सागर पोरे यांच्या आव्हानाला युवकांनी चांगला प्रतिसाद दिला यामध्ये चिकलठाण १.२,केडगाव, दहिगाव ,जेऊर व कुगाव येथील महिलांनी सहभाग नोंदवला या शिबिराचे उद्घाटन युवा नेते पृथ्वीराज पाटील यांनी केले यावेळी पंचायत समितीचे उपसभापती दत्ता सरडे, उपसरपंच मन्सूर सय्यद, माजी सरपंच महादेव पोरे ,ग्रामपंचायत सदस्य अमोल अवघडे ,अशोक गाडे ,मारुती गावडे, तुकाराम हवालदार शिवाजी वायसे ,पांडुरंग काळे, बाबा सय्यद , रियाज शेख आदी उपस्थित होते या शिबिरात६६ रक्तदात्यांनी रक्तदान केले प्रत्येक रक्तदात्यास प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देऊन उपसरपंच मन्सूर सय्यद यांनी आभार मानले. या शिबिरासाठी सोलापूरच्या सिद्धेश्वर ब्लड बँकेचे सहकार्य लाभले .
