Monday, April 21, 2025
Latest:
करमाळासकारात्मकसाखरउद्योग

आदिनाथच्या निवडणुकी साठी आता सज्ज व्हा- ॲड अजित विघ्ने

करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचे सहकाराचे मंदीर म्हणजे *आदिनाथ सहकारी साखर कारखाना* गेली अनेक वर्षापासुन बंद अवस्थेत असुन, शेतकरी, सभासद आणि कामगारांचे आतोनात नुकसान झालेले आहे. आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीसाठी सज्ज व्हावे असे मत ॲड अजित विघ्ने यांनी व्यक्त केले आहे. याबाबत त्यांनी सांगितले की  कारखान्याची परिस्थिती बिकट आहे.. आशा स्थितीत कारखाना आज ना उद्या व्यवस्थित चालेल या आशेने आजही प्रत्येकजण पहात आहे. जवळपास तीस हजार सभासदांचा हा कारखाना आज मोडकळीस आला आहे.. त्यातच आता आदिनाथ कारखान्याच्या विद्यमान संचालकांची मुदत संपत आलेली असुन, विठ्ठल आणि दामाजी नंतर आदिनाथची निवडणुक सोलापुर जिल्हातली एक महत्वपुर्ण निवडणुक असणार आहे. कारखाना तात्काळ चालु होणे अत्यंत गरजेचे होते, जेणेकरून अतिरिक्त उसाचा प्रश्न तर मार्गी लागणार होताच परंतु कर्मचाऱ्यांच्या रोजी रोटीचा प्रश्न देखिल मार्गी लागणार होता, परंतु कारखान्याचे प्रकरण न्यायालयीन प्रक्रीयेत अडकले, त्यामुळे आज कारखान्याचे गळीत होईल याची अपेक्षा करणे व्यर्थ ठरेल…. ऑगस्ट महीना जवळजवळ संपला आहे, ऑक्टोबर महिन्यात राज्यातले सगळे कारखाने चालु होतील. सध्या प्रत्येक कारखान्याचे क्लिनिंग होऊन, चालु गळीत हंगामात स्पर्धेत उतरण्याचे तयारीत आहेत, मात्र आपल्या आदिनाथचे सगळे वाटटोळे झाले आहे.. त्यामुळे चालु वर्षी कोणीही कारखाना चालु करणार नाहीत, कोर्टातील प्रकरणे रोजच चालु राहतील, विद्यमान संचालक यांनी सुरुवातीला भाडे तत्त्वावर कारखाना द्यायला मान्यता दिली.. बॅकेने सरफेसी ची कारवाई केली.. कारखाना भाडे तत्वावर देण्याची निविदा निघाली.. कारखाना बारामती अॅग्रो ने भाडेतत्वावर घेतला.. परंतु बँकेने दोन वर्षे ताबाच दिला नाही.. आता बॅकेने कोर्टात एक आणि बाहेर एक असे प्रकार केलेचे निष्पन्न होत आहे.. एकीकडे कराराचा भंग होईल याची भीती तर एकीकडे विद्यमान सत्ताधिशांचा दबाव., त्यामुळे आता जे काही होईल ते कोर्टात होईल परंतु यात वेळ जाईल आणि चालु गळीत हंगामातही कारखाना बंदच राहील.त्यामुळे आता आदिनाथ चालु होईल असे विचार मांडणे चुकीचे ठरेल.. आता कोणाचे किती चुकले याचाही हिशोब होणार आहे, बंद आदिनाथची निवडणुक प्रक्रीया चालु होणार आहे.. त्यामुळे प्रत्येकाने आता सज्ज झाले पाहिजे.. आदिनाथची निवडणुक लढण्यासाठी सज्ज व्हा!असे आवाहन ॲड अजित विघ्ने यांनी केले आहे.

 

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group