करमाळा तालुका शिवसेना शिंदे गटाच्या युवा सेना तालुकाप्रमुखपदी राहुल कानगुडे शहरप्रमुखपदी विशाल गायकवाड
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुका शिवसेना युवा सेना तालुकाप्रमुखपदी देवळाली गावचे युवा उद्योजक राहुल कानगुडे यांची निवड करण्यात आली असुन युवा सेना उपतालुकाप्रमुखपदी दादासाहेब तनपुरे लखन शिंदे खंडु जगताप यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र युवासेना राज्य सचिव किरण साळी यांच्या उपस्थितीत जिल्हा संर्पंकप्रमुख प्रा.शिवाजीराव सावंत यांच्या हस्ते देण्यात आले आहे. यावेळी जिल्हा प्रमुख महेश चिवटे शहरप्रमुख संजय शिलवंत उपस्थित होते. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ही निवड केली असल्याचे या पत्रात म्हटले आहे.युवा नेते खा.श्रीकांत शिंदे आरोग्यमंत्री प्रा.तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली गाव तेथे शाखा हे अभियान राबवणार असल्याचे नुतन युवा तालुकाप्रमुख राहुल कानगुडे यांनी सांगितले.