अकलूज, बार्शी, पंढरपूर करमाळा येथे होणार दिव्यांगांना प्रमाणपञ वाटप
करमाळा प्रतिनिधी अकलूज, पंढरपूर, करमाळा व बार्शी परिसरातील ज्या दिव्यांग बांधवांनी दिव्यांग प्रमाणपञ मिळण्यासाठी आॕनलाईन अर्ज केले होते, परंतू ते प्रमाणपञ नेण्यासाठी येऊ शकले नव्हते त्यांना प्रमाणपञ देण्यासाठी शासनाकङुन राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता या पंधरवङ्यामध्ये विशेष मोहीम राबवण्यात आली असल्याची माहीती जिल्हा शल्य चिकित्सक ङाॕ. प्रदीप ढेले यांनी दिली.
शनिवार दि. १७ सप्टेंबर ते रवीवार दि. २ आॕक्टोंबर २०२२ या कालावधीमध्ये राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता हा पंधरवङा साजरा करण्यात येतो आहे. यातिल दि. २२, २४, २८ व २९ रोजी बार्शी येथिल ग्रामिण रुग्णालयात, तर दि. २३, २७,३० व १ रोजी करमाळा, दि. २२, २७, २९ व १ रोजी पंढरपूर आणी दि. २३, २४, २८ व ३० रोजी अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपञाचे वाटप करण्यात येणार आहे.
सदर दिव्यांग प्रमाणपञ वाटप शिबीर हे अकलूज येथे. वैद्यकिय अधिक्षक, ङाॕ. महेश गुङे, बार्शी येथे वैद्यकिय अधिक्षक ङाॕ. सचिन कदम, पंढरपूर येथे वैद्यकिय अधिक्षक ङाॕ. महेश माने, करमाळा येथे वैद्यकिय अधिक्षक ङाॕ. अमोल ङुकरे यांच्या देखरेखीखाली पार पङत असून शिबिरामध्ये अस्थिरोग तज्ञ ङाॕ. निखिल मिसाळ, अकलूज आणी ङाॕ. भोसले, करमाळा हे काम पाहणार आहेत.
यावेळी सोबत येताना आॕनलाईन नोंदणी केलेली पावती, आधार कार्ङ, रेशन कार्ङ, पुर्वी उपचार घेतलेली सर्व कागदपञे घेऊन यावीत. दिव्यांगांना महत्वाची सुचना अशी की वरील चार ठिकाणी फक्त अस्थिव्यंग दिव्यांगांनाच प्रमाणपञे दिली जाणार आहेत.
