कै.आण्णा विठोबा नरोटे यांच्या द्वितीय पुण्यस्मरण निमित्त अहिल्या कार्नर नरुटे वस्ती बोरगाव येथे कार्यक्रम संपन्न
बोरगाव प्रतिनिधी
बोरगाव ता. करमाळा दि. 03/05/2023 रोजी कै. आण्णा विठोबा नरुटे यांच्या व्दितीय पुण्यस्मरणानिमित्त अहिल्या काॅर्नर नरुटे वस्ती बोरगाव येथे कार्यक्रम संपन्न झाला.
यानिमित्त बोरगाव व खांबेवाडी येथील वारकरी संप्रदायातील भजनी मंडळाचा सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता..
यामध्ये वासकर फडाचे बोरगाव मधील ह.भ.प. संजय (बप्पा) गायकवाड, दिलमेेश्वर चे गायक गजानन पिसाळ महाराज, काकासाहेब भोगल, मृदंगाचार्य बाबासाहेब घाडगे, पप्पू मस्के, खांबेवाडी मधील अर्जुन कांबळे, अभिमान नरुटे, झुंबर नरुटे तसेच धायखिंडी चे गायक बापू वाघमोडे महाराज लिंबराज कोळेकर इत्यादींनी भजनात सहभाग नोंदवला.
यानिमित्त घारगाव च्या विद्यमान सरपंच सौ लक्ष्मी संजय सरवदे तसेच नरुटे परिवाराचे भाचे व सामाजिक कार्यकर्ते मा. संजय सरवदे उपस्थित होते. त्याचबरोबर अनेक पाहुणे मंडळी व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. दुपारी 12:00 वा. प्रतिमेवर पुष्प वृष्टी करुन आरती झाली शेवटी अखिल भारतीय ग्राहक पंचायत करमाळा तालुकाध्यक्ष ॲड शशिकांत नरुटे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
