करमाळा

भाजपाचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय प्रमोद महाजन यांची पुण्यतिथी अभिवादन करून करमाळा भाजपच्यावतीने साजरी

करमाळा प्रतिनिधी

कुशल संघटक, वक्ते ,कुशल प्रशासक म्हणून राजकीय क्षेत्रामध्ये आजही ज्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते असे व्यक्तिमत्व म्हणजे स्वर्गीय प्रमोद जी महाजन असे मत भाजपा तालुका सरचिटणीस अमरजीत साळुंखे यांनी व्यक्त केले ते तस्वर्गीय महाजन यांच्या पुण्यतिथीनिमित्त करमाळा शहरातील प्रभाग 10 येथे अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते ते पुढे म्हणाले की अटलजींच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांचे सर्वात विश्वासू मंत्री म्हणून ओळखले जायचे त्याचबरोबर शिवसेना-भाजप युतीचे खरे शिल्पकार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते शिवसेना-भाजप युतीमध्ये समन्वयाचे काम त्यांनी केले त्याचबरोबर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या विराट सभा ही यशस्वी करण्यामागे त्यांचा सिंहाचा वाटा असत त्यांच्या विचाराने तयार झालेला कार्यकर्ता आजही निष्ठावंत म्हणून काम करत आहे संघटन वाढीसाठी त्यांचे मोठे योगदान आहे केंद्रातील अटलजीचे सरकार तसेच महाराष्ट्रातील युतीचे सरकार या काळामध्ये अनेक लोक कल्याणकारी निर्णय झाले
यावेळी डॉ श्रीराम परदेशी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले यावेळी सूर्यभान चव्हाण, सोशल मीडियाचे अध्यक्ष नितीन कांबळे, संजय गांधी निराधार योजनेचे नरेंद्रसिंह ठाकुर, अनिल नरसाळे, सचिन चव्हाण संजय तेली ,विनायक कांबळे आदी उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group