करमाळा

केळीला योग्य हमीभाव मिळावा शालेय पोषण आहारात केळीचा समावेश करावा केळी उत्पादक संघटनेचे मुख्यमंत्र्यांना साकडे

करमाळा प्रतिनिधी केळी उत्पादक शेतकरी संघाचे शिष्टमंडळ आज दि 1/6/2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेवून केळीचे पडलेले भाव यासंदरर्भात चर्चा केली केळीचा शालेय पोषण आहारामध्ये समावेश करावा केळीला 18.90 हमीभाव मिळावा तसेच प्रतीबंधीत असलेली कृषी औषधे कृषी केद्रावर सापडल्यास संबंधीत कृषी अधिकारी यांना जबाबदार धरावे यासंबंधी सविस्तर चर्चा झाली केळीचा शालेय पोषण आहारामध्ये समावेश करण्यासंधंर्बात येणाऱ्या कॅबीनेट च्या मिटींगमध्ये विषय घेण्याच्या सुचना संबंधीत सचीव यांना केल्या आहेत या प्रसंगी संघाचे अध्यक्ष किरणभाऊ चव्हाण उपाध्यक्ष राहुल बच्छाव
पाटील अतुलनाना माने पाटील राज्य समन्वयक सचिन कोरडे मार्गदर्शक विजयसिंह दादा गायकवाड
राज्य तज्ञ संचालक रविंद्र डिगे नामदेव वलेकर पंढरीनाथ इंगळे हनुमंत चिकणे संजय रोंगे जळगांव जिल्हा अध्यक्ष राजेश नवाल सोलापूर जिल्हा अध्यक्ष महेंद्र पाटील उपाध्यक्ष सचिन गगथडे पंढरपुर तालुका अध्यक्ष संतोष उपासे माढा ता अध्यक्ष केशव गायकवाड पाटील उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group