दहावीच्या परीक्षेत कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालयाची शिवांजली राऊत तालुक्यात प्रथम…
करमाळा, प्रतिनिधी –करमाळा शहरातील कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाने यंदाच्या वर्षीही निकालाची यशस्वी परंपरा राखली असून विद्यालयाचा निकाल 92.11%लागला असुन कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालयाची कु. राऊत शिवांजली महेश हिने 99.40 % गुण मिळवत तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे.
कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या कु. शिंदे पायल जोतिराम हिने 95 % मार्क मिळवून दुसरा क्रमांक तर क्षीरसागर श्रावणी प्रकाश हिने 94.40 % गुण मिळवत शाळेत तिसरा क्रमांक पटकावला आहे. .कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचा निकाल 92.11%लागला असून एकूण 203 विदयार्थी परीक्षेस सामोरे गेले होते त्यापैकी 187विदयार्थी पास झाले 50विदयार्थी distinction, 66विदयार्थी फर्स्ट क्लास, 48विदयार्थी सेकंड क्लास,23विदयार्थी पास क्लासमध्ये उत्तीर्ण झाले आहेत सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शिक्षकाचैैैैैैै अभिनंदन मुख्याध्यापक संतोष भागवत यांनी केले आहे.
