सुरताल संगीत विद्यालयाच्यावतीने विलासरावजी घुमरे सर यांना संगीतरसिक पुरस्कार
करमाळा प्रतिनिधी – करमाळा येथील सुरताल संगीत विद्यालयांच्या रौप्य महोत्सवानिमित्त संगीत रसिक पुरस्कार विद्या विकास मंडळाचे सचिव व यशवंत परिवाराच्या आधारस्तंभ मा.विलासरावजी घुमरे सर यांना अहमदनगर येथील कामगार न्यायाधीश मा.शरद देशपांडे साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी अँड श्री. शिरीष देशपांडे , सुरताल संगीत विद्यालय विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नरारे , यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे-पाटील संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड , आंतरराष्ट्रीय कलाकार , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल. बी. पाटील , उपप्राचार्य कॅप्टन संभाजी किर्दाक , पत्रकार विवेक येवले व मान्यवर उपस्थित होते.
सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नरारे यांनी करमाळा शहरात व आजूबाजूच्या गावामधून 25 वर्षांमध्ये अनेक कलाकारांना घडवले आहेत. या सुरताल संगीत विद्यालयाच्याा रौप्य महोत्सवानिमित्त या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या पुरस्कार वितरण प्रसंगी करमाळा शहरातील व ग्रामीण भागातील संगीत रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
