जगात जो पर्यंत चंद्र सुर्य तारे आहेत तो पर्यंत स्व.नामदेवरावजी जगताप यांचे कार्य आणि किर्ती ही विसरता येणार नाही-जयंत देवकर सर
करमाळा प्रतिनिधी- जगात जो पर्यंत चंद्र सुर्य तारे आहेत तो पर्यंत स्व.नामदेवरावजी जगताप यांचे कार्य आणि किर्ती ही विसरता येणार नाही असे प्रतिपादन जयंत देवकर सर यांनी केले.यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती चिंतामणी दादा जगताप,करमाळा नगर पालिकेचे माजी नगरसेवक राहुल भैय्या जगताप,अखिल भारतीय काँग्रेस आयचे तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप उपस्थित होते.
नामरत्न काॕम्प्लेक्स येथे आज स्व.नामदेवरावजी जगताप यांची जयंती साजरी करण्यात आली.सर्वप्रथम स्व.नामदेवरावजी जगताप यांच्या प्रतिमेला जयंत देवकर सर व अशोक घरबुडे यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.पुढे बोलताना श्री.देवकर सर म्हणाले कि स्व.नामदेवरावजी जगताप यांचे स्वातंत्र्यपुर्व काळापासुन खुप मोठे योगदान लाभले आहे.आपल्या हयातीमध्ये अनेक जणांचे संसार उभे करण्याचे काम साहेबांनी केले. तालुक्यामध्ये शिक्षण संस्था, उजनी धरण, प्रशस्त एस.टी.आगार, उपजिल्हा रुग्णालय,मांगी तलाव,आदि विविध विकासकामे साहेबांनी केली.
यावेळी संभाजी शिंदे,जैनुदीन शेख,गफुरभाई शेख,दस्तगीर पठाण, जावेदभाई शेख,महिबुब शेख,सुजय जगताप,प्रतिक जगताप,अतुल मारकड, गणेश फलफले,गितेश लोकरे,बबलु चिंचकर, कटारिया,उत्तरेश्वर सावंत,किरण साळुंखे,राजेंद्र कुंभार,सागर परदेशी,राजु तांबोळी,आदिनाथ खुटाळे,सोनु परदेशी,आदी उपस्थित होते.सर्वांनी पुष्पफुले वाहुन स्व नामदेवरावजी जगताप यांना अभिवादन केले.
