करमाळा

जेऊर येथे शिवसृष्टीसाठी 75 लाखाचा निधी देण्याची मा. आमदार नारायण आबा पाटील यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

करमाळा प्रतिनिधी

जेऊर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास आणि शिवसृष्टी साठी ७५ लाख रुपयांचा निधी मिळावा अशी मागणी माजी आमदार नारायण पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे केली आहे. राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून माजी आमदार नारायण पाटील यांनी नागपूर येथे जाऊन प्रत्यक्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी करमाळा मतदार संघातील रखडलेल्या विकासकामांना निधी मिळावा अशी मागणी त्यांनी केली. या कामाबद्दल चर्चा केली.तसेच जेऊर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभा करण्याचा जेऊर ग्रामपंचायतीचा संकल्प असून यासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या तसेच समती साठी राज्य सरकारचे सहकार्य आणि पुतळा व शिवसृष्टी साठी ७५ लाखरु पयांचा निधी मिळावा अशी आग्रही मागणी माजी आमदार नारायण पाटील यांनी मुख्मंत्र्यांकडे केली आहे. याबत चर्चा करत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला तसेच सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.या मागणीचे एक लेखी निवेदन माजी आमदार नारायण पाटील यांनी मुख्यमंत्री महोदय यांचे कडे सादर केले. जेऊर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ व पूर्णाकृती पुतळा उभा करण्याचा माजी आमदार नारायण पाटील यांचा मानस अनेक वर्षा पासून आहे. यासाठी जेऊर ग्रामपंचायत यांचे कडून जागा निश्चित करण्यात आली आहे. तसेच माजी आमदार नारायण पाटील यांनी स्वतः काही नामांकित व पारंगत अशा शिल्पकारांची भेट घेऊन याबाबत माहिती घेतली. परंतु विविध शासकीय परवानग्या आणि निधी याबाबत राज्य सरकारचे सहकार्य मिळावे म्हणून त्यांनी आता थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे साकडे घातले आहे. यामुळे लवकरच हा पुतळा उभा राहणार अशी आशा शिवप्रेमी आणि जेऊर परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत.

 

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group