आरोग्यकरमाळा

शिवसेनेच्यावतीने १९ एप्रिलला महिलांसाठी गर्भाशय कॅन्सरची मोफत लस दिली जाणार- प्रिंयाका गायकवाड

करमाळा प्रतिनिधी:- महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रेरणेतून, आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत व जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मा. खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे फाऊंडेशन, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेशजी चिवटे यांच्या सहकार्याने महिलांना गर्भाशयांचा कॅन्सर आजार होऊ नये यासाठी मोफत लसीकरण मोहीम राबिण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना महिला तालुका प्रमुख प्रियांका गायकवाड यांनी दिली.
यावेळी पुढे बोलताना गायकवाड म्हणाल्या की, शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली लसीकरण नोंदणीसाठी गर्भाशयाचे कॅन्सरचे प्रसिद्ध डॉक्टर श्रद्धा राहुल जवनजाल हे करमाळा येथे बुधवारी १९ एप्रिल २०२३ रोजी सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत अमरनाथ टावर येथे येणार होणार असून यावेळी त्यांचे डॉक्टर टीम महिलांच्या आरोग्याची तपासणी करून कॅन्सर प्रतिबंधक लस घेणाऱ्या महिलांची यादी करून त्या संबंधित महिलांना लस देणार आहेत.
या लस ची किंमत बाजारात प्रत्येकी चार हजार रुपये आहेत मात्र ही लस त्यांच्या वतीने मोफत देण्यात येणार आहे. तरी करमाळा शहरातील महिलांनी या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन प्रियांका गायकवाड यांनी महिलांना केले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group