सामाजिक कार्यकर्ते मा.पंचायत समिती सदस्य ॲड राहुल सावंत यांची जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड*
करमाळा येथील सामाजिक कार्यकर्ते हमाल पंचायतचे अध्यक्ष कामगार नेते स्वर्गीय सुभाष अण्णा सावंत यांचे सुपुत्र ॲड राहुल सावंत यांची जिल्हा नियोजन समितीवर सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्रानुसार आमदार संजयमामा शिंदे समर्थक म्हणून पंचायत समिती सदस्य असणारे राहुल सावंत यांची निवड झाली आहे . सोलापूर जिल्हयाचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते 19 डिसेंबर रोजी त्यांना निवडीचे पत्र समारंभपुर्वक प्रदान करण्यात येणार आहे. ॲड राहुल सावंत हे हमालपंचायतचे अध्यक्ष असून त्यांचे वडील स्वर्गीय सुभाष आण्णा सावंत यांचा वारसा यशस्वीपणे चालवत असून कष्टकरी हमाल शेतकरी कामगार सर्वसामान्य नागरिक यांना न्याय देण्यासाठी ते कार्यरत असतात. सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी आंदोलनाच्या मार्गाने अनेकांना न्याय देण्याचे काम केले आहे. शोषित वंचित कष्टकरी लोकांचे आधारवड म्हणून राहुल सावंत ओळखले जातात. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची जिल्हा नियोजन समिती सदस्य पदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीने हमाल पंचायत कष्टकरी शेतकरी सर्वसामान्य जनता यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांच्या निवडीचे स्वागत केले असून समाजातील विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.


