Friday, April 25, 2025
Latest:
करमाळा

धायखिंडी – करंजे रस्त्यासाठी गणेश (भाऊ) चिवटे यांच्या निधीतून ७५ लाख रु. निधी मंजूर:सरपंच काकासाहेब सरडे ग्रामस्थांनी केला चिवटे यांचा सत्कार

करमाळा प्रतिनिधी 
करमाळा -धायखिंडी – करंजे रस्ता जिल्हा नियोजन सदस्य गणेश (भाऊ) चिवटे यांच्या निधीतून मंजूर झाला असलेची माहिती करंजे गावचे सरपंच काकासाहेब सरडे यांनी दिली आहे. याबाबत अधिक बोलताना ते म्हणाले की,धायखिंडी-करंजे रस्ता हा अत्यंत खराब झाला होता,त्यामुळे या रस्त्यावरून जाताना नागरिकांना मरण यातना सहन कराव्या लागत होत्या म्हणून हा रस्ता दुरुस्ती व्हावा ही या भागातील लोकांची अनेक दिवसांची मागणी होती.त्यामुळे हा रस्ता दुरुस्त होऊन लोकांची समस्या दूर व्हावी म्हणून भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस तथा करंजे गावचे विद्यमान सरपंच काकासाहेब सरडे यांनी सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गणेश भाऊ चिवटे यांच्याकडे वारंवार रस्ता दुरुस्ती साठी विनंती,मागणी वा पाठपुरावा केला होता.सदर मागणीनुसार सोलापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक झाल्यानंतर गणेश चिवटे यांनी त्यांच्या निधीतून धायखिंडी ते करंजे या रस्त्यासाठी 75 लाख रुपये निधी मंजूर केला आहे.त्यामुळे या भागातील लोकात आनंदाचे वातावरण झाले आहे.करंजे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने गणेश (भाऊ) चिवटे यांचा भारतीय जनता पार्टी संपर्क कार्यालय येथे सत्कार करण्यात आला.तसेच रस्ता मंजूर केलेबद्दल नागरिकांनी त्यांचा सत्कार केला आहे.यावेळी बोलताना सरपंच काकासाहेब सरडे म्हणाले की,धायखिंडी ते करंजे हा रस्ता खुप खराब झाल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना व नागरिकांना दळणवळणासाठी खूप अडचणी निर्माण होत होत्या परंतु आपण या रस्त्यासाठी भरघोस असा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही करंजे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने गणेश भाऊंचे आभार व्यक्त करतो असे मत व्यक्त केले.यावेळी आजिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक पोपट बापू सरडे, ग्रामपंचायत सदस्य गणेश सरडे, चंद्रशेखर सरडे ,राजेंद्र शिंदे, अमोल थोरात, नामदेव सरडे, प्रशांत जाधव, नितीन पवळ, बबन ठोसर ,संजय सरडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group