प्रा.महेश निकत यांना संजीवनी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांचा राज्यस्तरीय शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर
करमाळा प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक चळवळीचा मानबिंदू असलेले महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांच्याच सेवेसाठी काम करणारे संजीवनी फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य यांचा “शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार” ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा चे संस्थापक प्रा. महेश निकत सर यांना नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या नवीन वर्षातील हा २ रा आणि आत्तापर्यंत चा ७ वा
सन्मान निष्ठेचा, गौरव कर्तुत्वाचा याप्रमाणे पुरस्काराचे स्वरूप राज्य मंत्रिमंडळातील नामवंत मंत्रीमहोदयांच्या शुभहस्ते व प्रसिद्ध व्यक्तींच्या उपस्थितीत मानपत्र, गौरवचिन्ह, सन्मानचिन्ह, महावस्त्र, गौरव पदक व मानाचा फेटा देऊन हा सन्मान 2 फेब्रुवारी 2024 रोजी संगमनेर येथे मोठ्या उत्साहात संपन्न होणार असल्याचे संस्थेचे चेअरमन डॉ. ज्ञानेश्वर वसंतराव सानप यांनी पत्राद्वारे कळविले आहे.
पुरस्कार प्रेरणा देतात ; प्रेरणेने राष्ट्र मोठे होते !
या विचारसूत्रावर आयोजित केलेल्या संजीवनी फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या गुणीजन गौरव पुरस्कारामुळे पुढील कार्यात सर्व करमाळा तालुक्यातील विद्यार्थी पालक व इतर सर्व राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात कार्य करत असलेल्या सर्वच लोकांना घेऊन पुढील काळात आणखी खूप चांगले कार्य करत राहणार आहे असे प्रा निकत यांनी यावेळी सांगितले.
