केंद्र सरकार नेहरू युवा केंद्राच्या जिल्हा सल्लागार समितीवर करमाळा येथील संतोष कांबळे यांची निवड
करमाळा प्रतिनिधी केंद्रीय युवक व क्रीडा मंत्रालयाद्वारे राबवण्यात येणाऱ्या नेहरू युवा संघटन या योजनेच्या नेहरू युवा केंद्र जिल्हा समितीवर सल्लागार म्हणून करमाळा येथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्व कार्यकर्ते व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संतोष कांबळे यांची निवड करण्यात आली युवा केंद्राच्या माध्यमातून राबवण्यात येणारे युवकांसाठी वेगवेगळ्या योजना व उपक्रम यासंबंधीत जिल्ह्यातून वेगवेगळ्या क्षेत्रातून काही युवा नेतृत्वांची निवड करण्यात आली आहे त्यामध्ये करमाळा येथील संतोष कांबळे यांची निवड करण्यात आली आहे संतोष कांबळे यांच्या निवडी मुळे युवा क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळाले असून ग्रामीण भागातील तरुणांसाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध होऊ शकते या निवडीनिमित्त संतोष कांबळे यांनी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश महामंत्री विक्रांत दादा पाटील युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस सुदर्शन पाटसकर व करमाळा येथील भाजपचे दिपक चव्हाण यांचे आभार व्यक्त केले आहे.
