पांगरे येथील अनेक पिढ्यांना आपली छाया देणारे शेकडो वर्षाचे जुने वडाची झाड कोसळले
पांगरे प्रतिनिधी पांगरे गावातील शेकडो वर्ष जुने असलेले वडाचे झाड हे अज्ञात कारणाने आग लागल्यामुळे जळून नष्ट झाले आहे. ही घटना दिनांक 15 एप्रिल 2023 रोजी दुपारी घडली. वडाचे झाड हे खूप जुने शेकडो वर्ष पूर्वीचे असल्याचे झाडाच्या असणाऱ्या अवाढव्य आकारावरून व झाडाचे झालेल्या जीर्ण अवस्थेवरून लक्षात येते. तसेच गावातील जुनी जाणकार मंडळी सांगतात की, आम्ही जेव्हापासून हे झाड पाहतो आहे हे असेच आहे. वडाच्या झाडाला लागलेली आग लक्षात आल्यानंतर श्री सुजित दोंड यांनी ॲड. दत्तात्रय सोनवणे, सरपंच प्रतिनिधी यांना फोन करून खबर दिली. त्यानुसार ॲड. सोनवणे यांनी तात्काळ करमाळा येथील अग्निशामक दलास फोन केल्याने अग्निशामक दलाने तत्पर्ता दाखवून पांगरे गावामध्ये झाडाला लागलेली आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. अग्नी शमन दलाच्या पाण्याचे सात बंब पाणी मारून आग विझवली. त्यामुळे बऱ्याच अंशी झाडाला लागलेली आग विझवण्यात यश आले. परंतु संध्याकाळी पुन्हा त्या आगीने पेट घेतल्याने उर्वरित अर्धवट राहिलेले झाडाचे फाटेही कोसळले.
या विशाल अशा वडाच्या झाडावरती चित्र बलक पक्षांचे वास्तव्य होते. वडाच्या झाडावरती शेकडो चित्र बलक वास्तव्यास होते. त्यावरती त्यांनी घरटी केलेली होती. त्या घरट्यामध्ये लहान लहान पिल्ले होते वडाचे झाड जळून नष्ट झाल्या कारणाने चित्र बलकाची पिल्ले कोसळणाऱ्या फांद्याबरोबर खाली पडले होते. त्यामध्ये पन्नास पक्षी व पिल्ले मृत पावले. त्याचबरोबर फॉरेस्ट कर्मचारी व रेस्क्यू टीमचे मदतीने व गावातील पक्षीप्रेमी यांच्या मदतीने जीवंत असणाऱ्या जखमी व चांगल्या पिल्लांना वाचवून त्यांना पुणे येथे उपचार व संगोपना साठी नेण्यात आले. त्यामुळे 63 पिल्लांचा जीव वाचला आहे. झाडाची आग विझवण्यासाठी गावातील अनेक तरुणांचे सहकार्य मिळाले. तसेच जखमी पक्षी व पिल्लांना वाचवण्यास व ते घेऊन जाण्यासाठी फॉरेस्ट कर्मचारी यांच्यासह रेस्क्यू टीमचे सदस्य यांचे बरोबरच गावातील अनेक पक्षी प्रेमींची मदत मिळाली. त्यामध्ये सरपंच प्रतिनिधी ॲड. दत्तात्रय सोनवणे, उपसरपंच प्रतिनिधी विवेक पाटील, माजी उपसरपंच सचिन पिसाळ, पोलीस पाटील युवराज सावंत, रामा धाडस, संतोष पाटील, राजू वाघमारे, नाथा केंदळे, अंगद सोनवणे, गोपाळ कोळी, दादा खंदारे इत्यादी लोकांचे सहकार्य लाभले. झालेल्या घटनेबद्दल सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे व पक्षी वाचवण्याचे केलेल्या कार्यात बद्दल कौतुक होत आहे.