खासदार राजू शेट्टी साहेब यांच्या आदेशानुसार ऊस दरासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 25 नोव्हेंबरला चक्काजाम आंदोलन-आण्णा सुपनवर
करमाळा प्रतिनिधी ,खासदार राजू शेट्टी साहेब यांनी ऊस दरासाठी संपूर्ण महाराष्ट्राच्या मध्ये चक्काजाम आंदोलन करण्याचे ठरविले आहे दिनांक 25/11/2022 रोजी वार शुक्रवार या दिवशी सकाळी दहा वाजता जातेगाव येथे करमाळा तालुका ऊस दर संघर्ष समिती स्वाभिमानी शेतकरी संघटना करमाळायांच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे याचे निवेदन करमाळा तहसीलदार यांना देण्यात आले यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुदर्शन शेळके हिवरे गावचे सरपंच दिलीप फरतडे लावंड आधीचं शेतकरी पदाधिकारी उपस्थित होते.
