आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगामाचा शुभारंभ 25 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संप्पन होणार
करमाळा प्रतिनिधी श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम 2022 23 शुंभारंभ रविवार दिनांक 25 डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजून पंधरा मिनिटांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते व महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांच्या उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती सहकारी साखर कारखाने चेअरमन धनंजय डोंगरे यांनी दिली आहे .कार्यक्रमास करमाळ्याचे माजी आमदार नारायण आबा पाटील बागल गटाचे नेत्या आदिनाथ सहकारी साखर कारखाना संचालिका सौ. रश्मी दीदी बागल कोलते महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघ हे उपस्थित राहणार असल्याचे कारखाना प्रशासण्याच्यावतीने करण्यात आले आहे. आदिनाथ कारखान्याचे काम सर्व पूर्ण झाले असून यावर्षीचा सन 2022 23 चा ंहगाम पूर्ण क्षमतेने यशस्वी होईल असा विश्वास संचालक मंडळांनी व्यक्त केला आहे दिनांक 25 डिसेंबर रोजी होणाऱ्या गळीत हंगामाच्या शुभारंभ सर्व संचालक पदाधिकारी माजी संचालक शेतकरी सभासद यांनी उपस्थित राहावे असे आवाहन कार्यकारी संचालक अरुण बागनवर यांनी केले आहे.
