करमाळ्यात भव्य ग्लोबल टॅलेंट सर्च परीक्षा 2024 उत्साहात संपन्न
करमाळा प्रतिनिधी
करमाळा शहरातील ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित भव्य ग्लोबल टॅलेंट सर्च परीक्षा 2024 आज करमाळ्यात उत्साहात पार पडली. या परीक्षेसाठी पूर्ण करमाळा तालुक्यातील जवळ जवळ 40 विद्यालयात प्रथम पूर्व परीक्षा मागील 15 दिवासात घेऊन त्यातून 847 विद्यार्थ्यांची मुख्य परीक्षा आज 7 जानेवारीला करमाळा येथील ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट परीक्षा केंद्र घेऊन पार पडली. आज सर्व ग्रामीण भागातील तसेच शहरातून अनेक विद्यार्थी आनंदात या परीक्षेस सहभागी झाले. करमाळा शहरात नेहमी काहीतरी वेगळे करण्याचा ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट चा प्रयत्न असतो.आज झालेल्या या परीक्षेचा निकाल व बक्षीस वितरण 14 जानेवारी रोजी विकी मंगल कार्यालय येथे होणार असून या दिवस सर्व विद्यार्थी व पालक यांना श्री वसंत हंकरे यांचे ” न समजलेले आई बाप ” या विषयावर धडाकेबाज व्याख्यान आयोजित केले आहे.या सर्व कामात इन्स्टिट्युट मधील सर्व शिक्षकांनी व विद्यार्थी यांनी खूप मोलाची साथ दिली
