Wednesday, April 23, 2025
Latest:
करमाळा

झरे येथील जयप्रकाश बिले पब्लिक स्कूल मध्ये विद्यार्थी परिषद संपन्न

करमाळा प्रतिनिधी 
झरे श्री भैरवनाथ प्रतिष्ठान संचलित जयप्रकाश बिले पब्लिक स्कूल झरे येथे एक दिवसीय विद्यार्थी परिषद (स्टुडन्ट लीड कॉन्फरन्स )मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी संस्थापक अध्यक्ष जयप्रकाश बिले होते. या परिषदेचे उद्घाटन यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष श्री गणेश भाऊ करे पाटील यांनी केले. यावेळी स्कूल मधील वाचन ,लिखाण ,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन,वक्तृत्व स्पर्धा खेळांच्या स्पर्धा, संगीत ,नाट्य या उपक्रमाबाबत कौतुक केले. शाळा प्रामुख्याने मुलांच्या सर्वांगीण विकासाबाबत करत असलेल्या प्रयत्नाबाबत संस्थेच्या संचालिका डॉक्टर स्वाती बिले यांचे मनापासून कौतुक केले.यावेळी पालकांना शिक्षकांना या तंत्रज्ञानातील स्पर्धेच्या काळात पाल्यांना मोबाईल पासून कसे दूर ठेवता येईल याचा प्रयत्न पालकांनी करावा असे स्पष्ट केले. तसेच परिषदेत भाग घेतलेल्या 190 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मेडल देण्याचे यशकल्याणी संस्थेमार्फत जाहीर केले. श्री हरिदास डांगे साहेब यांनी फक्त डॉक्टर ,इंजिनिअर या करियर क्षेत्रा बरोबरच उद्योग ,शेती व्यवसाय,सेवा उद्योग याचेही ज्ञान शालेय जीवनापासून सुरू करावे असे मुलांना मार्गदर्शन केले.अध्यक्षीय भाषणात प्राचार्य बिले यांनी करमाळा तालुक्यत लीड शिक्षणाबरोबरच 2024 पासून बीसीए महाविद्यालय सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी मुलांनी तयार केलेले विविध मॉडल्स पाहुण्यांना व पालकांना समजावून सांगितले. सर्वांनी मुलांच्या उपक्रमांचे व नाविन्यपूर्ण कल्पनांचे कौतुक केले. यावेळी संस्थेस संगणकाची देणगी देणाऱ्या माननीय हरिदास डांगे व नागेश जाधव यांचा सत्कार सचिव युवराज बिले यांनी केला. मुख्याध्यापक खराडे यांनी मान्यवरांचे आभार मानले आणि सूत्रसंचालन नम्रता साळुंखे यांनी केले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group