प्रविण शिंदे ऊर्फ बंडु गुरुजी- विश्वास आणि श्रद्धेचे प्रतिक असलेला सहृदयी माणुस
आमदार संजयमामा शिंदे यांचे स्वीय सहाय्यक, सहकारी,बंधु आणि एक संयमी, शिस्तीचे आणि मनमिळाऊ, काळजीवाहु आणि प्रत्येकाला आदराने, सन्मानाने बोलुन आपलेसे करणारा एक दिलदार माणूस.. आज रोजी त्यांचा वाढदिवस असुन त्यांना वाढदिवसाचे निमित्ताने भरभरून शुभेच्छा देताना आज प्रत्येकाला आनंद होतोय… एखादया माणसाचा सहवास देखिल अतिशय महत्वाचा असतो.. भगवान कृष्णाला जसा सुदामा नावाचा मित्र,सखा होता… असाच एक सच्चा साथी आमदार संजयमामा शिंदे यांना लाभलेला आहे… अगदी बालपणापासुन, शालेय जीवनापासुन प्रविण गुरुजी मामांचे साथीला आहेत.. सोलापुर जिल्ह्यात राजकीय, सामाजिक आणि उद्योगधंद्यात आपला नावलौकीक करताना आमदार संजयमामा शिंदे यांनी स्वतःचे सोबतीला कायम असणारी माणसे त्यांचे बालपणापासुनचे संवगडीच आहेत… केवळ प्रविण शिंदे गुरुजी च नाही तर सोलापुरला स्वीय सहाय्यक म्हणुन काम करणारे संजय अंबोले, मुंबईचे स्वीय सहाय्यक समाधान कांबळे, करमाळाचे वीर सर, मामांचे सारथ्य करणारे रमेशभाऊ ही मंडळी सुद्धा कार्यतत्पर माणसे असुन, मामांचे प्रत्येक कार्यकर्त्याला आणि जनसामान्यांना अतिशय श्रध्दापुर्वक जपतात.. मामांची ही यंत्रणा जिल्ह्यात अन्यत्र कुठेही दिसुन आली नाही.. यामधे आपले प्रविण गुरुजी तर माणुसकीचा प्रेमळ झराच आहे!… आयुष्यात खुप माणसे भेटतात परंतु प्रत्येकाला आदराने बोलणारा आणि माणुसकीची नाती जपणारा, विश्वासाची नाती जपणारा माणुसच खरे आयुष्य जगत असतो…. आमदार. संजयमामांचे बरोबर चोवीस तास असणारा हा माणुस कायम प्रसन्न मुद्रेत असतो… ही प्रसन्नता प्रविण गुरुजींचे खुप मोठे धन आहे… ही प्रसन्नता अखंडीत राहो हीच वाढदिवसाचे निमित्त शुभकामना.! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रविण गुरुजी…
