भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष गणेश चिवटे यांच्या वाढदिवसानिम्मित रक्तदान शिबीर संप्पन
करमाळा प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष गणेश चिवटे व शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा संपर्क कार्यालय गायकवाड चौक येथे शुक्रवार दिनांक 28 /10 /2022 रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते,
सदर रक्तदान शिबिरामध्ये 239 रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला ,या रक्तदान शिबिराचे उद्घाटन करमाळा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक भुजबळ साहेब व दत्तकला शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रा.रामदास झोळ सर यांच्या हस्ते करण्यात आले,
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बिटरगाव श्रीचे सरपंच अभिजीत मुरूमकर, वरकटनेचे सरपंच बापू तनपुरे ,करंजेचे सरपंच राजेंद्र जाधव ,गुरसुळीचे सामाजिक कार्यकर्ते राजूशेठ शियाळ, हिवरेचे सरपंच दत्तात्रय घाडगे,
अर्जुननगरचे सरपंच प्रकाश थोरात, मिरगव्हाणचे सरपंच मच्छिंद्र हाके, विटचे उपसरपंच संजय ढेरे, पांडेचे उपसरपंच नितीन निकम उपस्थित होते ,
यावेळी दत्तकला शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रा. रामदास झोळ सर यांनी भाजपा तालुका अध्यक्ष गणेश चिवटे यांचे सामाजिक कार्य हे कौतुकास्पद आहे ,त्यांचे विद्यार्थ्यांना मोफत भात भाजी वाटप, निराधार वृद्धांना दररोज मोफत जेवण आणि दरवर्षी भव्य असे रक्तदान शिबिर अशा कार्यक्रमातून त्यांच्या सामाजिक कार्याचा ठसा करमाळा तालुक्यात पसरलेला दिसून येतो असे मत व्यक्त केले, या शिबिरास पत्रकार महेश चिवटे, नासिर कबीर, सचिन जव्हेरी, शितलकुमार मोटे, सिद्धार्थ वाघमारे, हर्षद गाडे यांनी भेट दिली,
या रक्तदान शिबिरास मे श्री कमला भवानी ब्लड सेंटर करमाळा यांचे मोलाचे सहकार्य लाभले,
यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते विठ्ठलराव भणगे, जिल्हा सरचिटणीस किरण बोकन, बाळासाहेब कुंभार, प्रदीप देवी, तालुका सरचिटणीस काकासाहेब सरडे ,महाराष्ट्र चॅम्पियन अफसर जाधव, तालुका उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे, विटचे बाळासाहेब ढेरे, नितीन चोपडे,मोहन शिंदे, दादासाहेब देवकर ,बापू बरडे, पांडुरंग लोंढे, संजय कानगुडे, तुषार जाधव, मोरे चेअरमन,सचिन गायकवाड ,धर्मराज नाळे ,आजिनाथ सुरवसे ,हर्षद गाडे, दीपक गायकवाड,शरद एकाड ,आण्णा पडवळे ,विशाल साळुंखे, भैय्या गोसावी, किरण शिंदे, बापू मोहोळकर ,सोमनाथ घाडगे ,तुकाराम भोसले ,विशाल घाडगे, प्रकाश ननवरे, किरण बागल, जयंत काळे पाटील , प्रसाद गेंड, दत्तात्रय बेडकुते,वसीम सय्यद, भैय्या कुंभार, माणिक निळ, संदीप गावडे ,रंगनाथ काळे ,सागर सरडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते,
