Sunday, April 20, 2025
Latest:
Uncategorized

पोलिसांच्या मागण्यांसाठी ‘जनशक्ती’ची रणरागिनी १० दिवसापासून ‘आझाद’वर ▪️ आज पासून अन्नत्याग आंदोलन करणार : विनिता बर्फे

प्रतिनिधी

राज्यातील पोलीस बांधवांना दिवाळीचा बोनस म्हणून १ महिन्याचा पगार द्या या प्रमुख मागण्यांसह वेगवेगळ्या मागण्या घेऊन जनशक्तीचे प्रमुख अतुल खूपसे पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह मुंबईच्या आझाद मैदानावर २० ऑक्टोबर रोजी खर्डा भाकर आंदोलन केले. त्यानंतर या आंदोलनाची धुरा जनशक्तीच्या महिला प्रदेशाध्यक्ष विनिता बर्फे यांनी स्वीकारून दिवाळीपासून ते आज दहाव्या दिवशी पोलिसांच्या विविध मागण्यासाठी आधार मैदानावर ठाण मांडून बसल्या असल्या असून जनशक्तीची रणरागिणीने पोलिसांसाठी आजपासून अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे.

सण कोणताही असो, पोलीस बांधवांना तो साजरा करता येतच नाही. घरदार कुटुंब सोडून तो जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र कष्ट करत असतो. आमदार-खासदार मंत्र्यांचे दौरे, वेगवेगळ्या पक्षाचे संघटनांचे मोर्चे आंदोलन, वेगवेगळ्या मिरवणुका, वेगवेगळ्या जयंत्या या सर्व बंदोबस्ताची जबाबदारी पोलीस बांधवावर असते. त्यामुळे सण आहे काय आणि नाही काय..? त्यांना कसलाच फरक पडत नाही.
२४ तास ड्युटी करणारे या पोलीस बांधवांना राज्य सरकारकडून अपेक्षित पगार देखील मिळत नाही. अनेक जिल्ह्यात पोलिसांना राहायला घरी सुद्धा नाहीत. अनेक घरांची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे तोंड दाबून बुक्क्याचा मार या पोलीस बांधवांना सहन करावा लागत आहे. यासाठी जनशक्ती संघटनेने आंदोलनाच्या हत्यार उपसून आझाद मैदानावर शेकडो कार्यकर्त्यांसह खर्डा भाकर आंदोलन केले. या खर्डा भाकर आंदोलनानंतर आंदोलनाची पुढील ठरवत अतुल खूपसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला प्रदेशाध्यक्ष विनिता बर्फे या गेल्या दहा दिवसापासून आझाद मैदानावर ठिय्या आंदोलन करत तळ ठोकून बसल्या आहेत. दरम्यान या आंदोलनाला करुणा धनंजय मुंडे, ठाकरे गटाच्या शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे, बाळासाहेबांची शिवसेना नेते संजय कोकाटे, मराठा मोर्चा समन्वयक आबासाहेब पाटील यांच्यासह वेगवेगळ्या पक्षाकडून आणि संघटनांकडून पाठिंबा मिळत आहे.

▪️ चौकट
… तर आझाद वरून माझी अंत्ययात्रा निघणार
– पोलीस बांधवांचे अत्यंत दयनीय अवस्था आहे. तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागत आहे. पोलिसांच्या विविध मागण्यासाठी आम्ही आंदोलन केले. सरकारने सर्वच मागण्या मान्य कराव्यात अशी आमच्या अपेक्षा नाहीत. मात्र पोलिसांवर होणारा अन्याय कमी होणाऱ्या मागण्या तरी मान्य यासाठी मी आजपासून अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील किंवा आझाद मैदानावरून माझी अंत्ययात्रा निघेल.

– विनिता बर्फे
जनशक्ती संघटना महिला प्रदेशाध्यक्ष

▪️

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group