करमाळयात भिमाई बहुउद्देशीय सामाजिक संस्था बागल गटाच्या वतीने नेत्ररोग तपासणी शिबिर संप्पन
करमाळा प्रतिनिधी भिमाई बहुउद्देशीय सामाजिक संस्था व बागल गटाच्या वतीने दिनांक 13/10/2022 रोजी निळा झेंडा चौक, सुमंत नगर करमाळा येथे इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त नेत्ररोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या नेत्र तपासणी शिबिराचे उद़्घाटन जयकुमार कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जागतिक दृष्टी दिनानिमित्त पी.बी.एम.एच.व्ही देसाई आय. हॉस्पिटल, करमाळा व्हीजन सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आनंद बाँनसा, उदय झुनन, दीपक सादिगळे यांनी तपासण्या केल्या.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते शंभू आहेर, हैदर मोगल, दिलशाद मोगल, तयराबी मोगल, हकिमा मुलानी, हैदर बेग मोगल, सिमरन शेख, फर्जाना मुलानी, नसीम मुलानी, मोहम्मद दारुवाले, तारामती क्षिरसागर, इतार मुलानी, समीर शेख, शाहरुख शेख, आकाश दामोदरे, मंगेश आव्हाड, अरबाज पठाण, पप्पू पठाण, सचिन माने आदिजन उपस्थित होते. तसेच या नेत्रतपासणी शिबिरामध्ये नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
