करमाळा उपजिल्हा रुग्णालयाच्या बांधकामासाठी 2022 -23 च्या अर्थसंकल्पात 25 निधीची तरतूद – आमदार संजयमामा शिंदे
करमाळा प्रतिनिधी
करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये 50 खाटांचे श्रेणीवर्धन करून 100 खाटांचे रुग्णालय इमारत बांधकामासाठी जुलै 2021 मध्ये 25.20 कोटी ची प्रशासकीय मंजुरी मिळालेली होती .सदर उपजिल्हा रुग्णालयासाठी 20 ऑक्टोबर 2022 शासनाच्या परिपत्रकानुसार निधीची तरतूद केलेली आहे. सदर निधी सन 2022 – 23 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये हुडको या योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेला असून सदर निधी वितरित करण्याबाबत आदेश देण्यात आलेला आहे .त्यामुळे करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या बांधकामाचा मार्ग आता मोकळा झालेला असून लवकरच या बांधकामाची निविदा प्रक्रिया निघून प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात होईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
सन 2022 -23 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ग्रामीण रुग्णालय बांधकाम करण्यासाठी 32 कोटी 74 लाख 91 हजार चा निधी हस्तांतरित करण्यात आलेला असून यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 51 ग्रामीण रुग्णालयाच्या बळकटी करण्यासाठी या निधीच्या उपयोग होणार आहे.
