.ज्योतिर्लिंग दूध संकलन केंद्र झरे येथे भाजपा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांच्या हस्ते दिवाळीनिमित्त शेतकऱ्यांना साखर वाटप
करमाळा – हिंदू धर्मात सर्वात मोठा समजला जाणारा सण म्हणजे दिवाळी या सणाचे अवचित्य साधुन श्री ज्योतिर्लिंग दूध संकलन केंद्र झरे या दूध उत्पादक संस्थेचे चेअरमन सोमनाथ घाडगे यांनी सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांना साखर वाटप केली ही कौतुकाची बाब आहे, अशा सामाजिक कार्यातून संस्थेचे चेअरमन सोमनाथ घाडगे आणि दूध उत्पादक यांच्यातील असलेले आपुलकीचे नाते दिसून येत आहे असे भाजपा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी सांगितले,
यावेळी सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांनी संस्थेचे चेअरमन सोमनाथ घाडगे यांचे आभार मानले,
यावेळी विकास सोसायटीचे चेअरमन विठ्ठल गाडगे, उत्तरेश्वर शेळके ,रामदास कुर्डे, बबन घाडगे ,सोमनाथ घाडगे, पिंटू कोठावळे, कल्याण आंब्रुळे, निखिल कोकाटे, औदुंबर जोशी, दादा दुर्गुळे, आण्णा गायकवाड, दत्तात्रय कोकाटे, बबन गायकवाड, शिवाजी घाडगे, पोपट ढेरे ,दादा काळे ,किशोर शिंदे ,अशोक कोठावळे आदी दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते,
