करमाळयाची कुलस्वामिनी आई कमलाभवानी मंदिरामध्ये घटस्थापना नवरात्र उत्सवाची जल्लोषात सुरूवात
करमाळा प्रतिनिधी श्री जगदंबा कमलाभवानी नवरात्र उत्सव दिनांक 26 सप्टेंबर रोजी सुरू झाला श्री कमला भवानी मंदिरामध्ये सकाळी साडे आठ वाजता श्री जगदंबा देवी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री सोमनाथ चिवटे यांचे हस्ते विधिवत पूजा करण्यात आली गतवर्षीचे मक्तेदार पुजारी श्री दादासाहेब देविदास पुजारी नारायण देविदास सोरटे आणि कमलाकर साहेबराव सोरटे यांनी देवीची पूजा करून घटस्थापने साठी सर्व तयारी अतिशय चांगल्या प्रकारे केली आणि भक्ती भावाने श्री बसवराज चिवटे व त्यांच्या पत्नी या दामप्त्याकडुन हस्ते घटस्थापना करण्यात आली तसेच सचिव अनिल पाटील विश्वास डाॅ प्रदीप कुमार जाधव पाटील डॉक्टर महेंद्र नागरे सुशील राठोडआणि नूतन पुजारी श्री ओंकार दादासाहेब पुजारी रवींद्र बाळासाहेब सोरटे आणि कमलाकर संभाजी सोरटे यांच्याकडे कार्यभार सुपूर्त करण्यात आला वरील सर्व कार्यक्रम सप्तशती पाठ करणारे पुराणिक रविराज पुराणिक सुशील पुराणिक यांच्या मंत्राच्या जयघोशामध्ये अतिशय उत्साह आणि धार्मिक भावनेतून करण्यात आला यावेळी निसर्गाने ही कृपा करून संपूर्ण मंदिरावर तसेच तालुक्यामध्ये पर्जन्यवृष्टी केली याचवेळी श्री देवी मंदिराच्या गर्भ ग्रहांमध्ये माही डेकोरेटर्स करमाळा यांचेकडून आज सोमवार असल्याकारणाने पांढऱ्या फुलांमध्ये आकर्षक अशा प्रकारची सजावट करण्यात आलेली होती त्याचप्रमाणे शासनाने बंधन मुक्त सण साजरा करण्याचे असल्याने भक्तगणांची संख्या अतिशय होती उत्साह आणि धार्मिक भावना यांचा पूर ऊसांडून वाहत होता त्याचप्रमाणे डॉक्टर विशाल हिरे डी वाय एस पी आणि माननीय पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे साहेब पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे करमाळा यांनी अतिशय चोक बंदोबस्त मंदिरामध्ये केला असल्याकारणाने भक्तामध्ये शिस्तप्रियता दिसून आली जाकिर झारेकरी यांनी केलेले लाईट डेकोरेशन अतिशय अप्रतिम दिसून आले छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रतिकृती असणाऱ्या लाइटिंग झारेकरी यांचे आकर्षण ठरले .त्याचप्रमाणे या सर्व कार्यक्रमासाठी श्री जगदंबा देवी देवस्थान ट्रस्टचे व्यवस्थापक अशोक गाठे लेखाधिकारी महादेव भोसले आणि कर्मचारी सर्व स्टॉप यांनी अतिशय परिश्रम घेतले.तसेच सरपंच महेश सोरटे उपसरपंच दीपक थोरबोले तंटामुक्ती अध्यक्ष सचिन चोरमले तसेच ग्रामपंचायत सदस्य सिद्धेश्वर सोरटे अमोल चव्हाण प्रभाकर सोरटे प्रभाकर फलफले संतोष पवार जयराम सोरटे सचिन शिंदे तसेच श्री देवस्थानचे मानकरी हनुमंत पवार बबन दिवटे भाऊसाहेब फुलारे रमेश येळवणे श्रीकांत गोमे ईश्वर पवार विनायक पवार पद्माकर सूर्यपुजारी मनोज जामदार विलास डबडे प्रमोद गायकवाड शिवाजी पकाले तसेच श्रीराम फलफले अभिमान पवार दिलीप चव्हाण बापू चांदगुडे अर्जुन चव्हाण प्रभाकर दौंडे अंगद बिडवे शेखर पवार सतीश अनभुले श्रीदेवीचा सर्व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
