लॅम्पिचा वाढता प्रार्दृभावामुळे पशुधन संकटात प्रशासनाच्या उदासिनतेमुळे गंभीर परिस्थिती ठोस भुमिका घ्यावी- दिग्विजय बागल
वाशिंबे प्रतिनिधी सोलापुर जिल्हयातील गाय-म्हैस वर्गातील जनावरांमध्ये लम्पि स्किन विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून 3 तालुक्यांमधील 12 जनावर बाधित झाली आहेत. यामध्ये करमाळा तालुक्यातील राजुरी येथील जर्सी गायीचा मृत्यू झाला असून ही बाब गंभीर आहे. तरीसुद्धा प्रशासन यावर कोणतीच कार्यवाही करताना दिसून येत नसल्याचे प्रतिपादन मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल यांनी केले आहे.लम्पी साथ नियंत्रणात असून लसीकरण मोहिम प्रशासनतर्फे सांगण्यात येत आहे. परंतु लसीकरण किंवा बाधित जनावरांची देखभाल तसेच पशुपालकांचे समुपदेशन सुद्धा प्रशासनाकडून होत नाही. बाधित जनावरांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च शासनातर्फे होतो असे सांगण्यात येते, पण वेळेवर मदत मिळत नसल्याने पशुपालक नाराज आहेत तसेच मृत्यू झाल्यास देण्यात येणारी मदत अत्यंत तुटपुंजी असल्याने पशुपालक नाराज आहेत.
महामारीचा प्रादुर्भाव नियंत्रीत ठेवण्यासाठी सर्व ठिकाणच्या आठवडी बाजारांध्ये जनावरांची खरेदी-विक्री बंद करण्यात आले आहेत. लम्पीच्या संकटामुळे प्रशासनाने राज्यातील जनावराचे बाजार बंद केले आहेत .यामुळे कोट्यावधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली असून हातावर पोट असणाऱ्या अनेकांचे रोजगार बुडाले आहेत.
तसेच बागल पुढे बोलताना म्हणाले, या आजाराबाबत लोकांमध्ये गैरसमज पसरू नये, अजून जनावरे मृत्युमुखी व बाधित होऊ नयेत तसेच आजाराबाबतची योग्य खबरदारी माहिती, प्रत्येक शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी स्वतः पशुवैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन भेट देण्याचे आवाहन बागल यांनी केले.
जिल्हा पशुधन अधिकारी तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी ‘लम्पि’ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात, यासाठी मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध करून लसीकरणाचा वेग वाढवावा असेही बागल म्हणाले आहे.